For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एसजीव्ही आयुर्वेद महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात

06:28 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसजीव्ही आयुर्वेद महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बैलहोंगल येथील एस.जी.व्ही. आयुर्वेद महाविद्यालयाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. वैद्यकीय पदवीचा वापर सेवेसाठी करून समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन एस.जी.व्ही. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मुरसाविर मठाचे मठाधीश प्रभू निलकंठ स्वामीजी यांनी केले.

शनिवारी झालेल्या पदवीदान समारंभात हुबळी येथील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संतोष गडादावर, डॉ. नागेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. सुभाष बागडे आदी उपस्थित होते. वैद्यकीय पदवी मिळविणाऱ्या डॉ. वैष्णवी पाटील, डॉ. सायली रावत, डॉ. श्रावणी पाटील, डॉ. सौरभ जगताप, डॉ. संकेत गाडे, डॉ. अश्विनी कोचरी आदींनी आपले अनुभव कथन केले. वैद्यकीय पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुभाष बागडे यांनी स्वागत केले. ऐश्वर्या व सहकाऱ्यांनी धन्वंतरी गीत गायिले. डॉ. नरेंद्र गुरव यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.