For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसएफए चॅम्पियनशिप 4 ऑक्टोबरपासून

06:22 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसएफए चॅम्पियनशिप 4 ऑक्टोबरपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) यांनी बुधवारी एसएफए चॅम्पियनशिप 2024-25 ची घोषणा केली असून 4 ऑक्टोबरपासून भारतातील दहा शहरांत त्याचे आयोजन होणार आहे. देशातील 7000 सर्वोत्तम क्रीडा शाळांमधून सुमारे दीड लाखाहून अधिक खेळाडू त्यात सहभागी होणार आहेत.

सर्व केंद्रात होणाऱ्या 31 क्रीडा प्रकारांत हे विद्यार्थी भाग घेतील. नऊ वर्षाच्या स्पर्धेच्या इतिहासात नागालँडमध्ये (दिमापूर) प्रथमच ही स्पर्धा होणार आहे. एसएफए चॅम्पियनशिपसाठी नोंदणी खुली करण्यात आली आहे. एसएफए चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून त्याचा प्रतिसाद प्रत्येक वर्षी वाढत गेला असून 2015 मध्ये मुंबईत त्याची सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 21 वेळा ही स्पर्धा झाली असून हैदराबाद, उत्तराखंड, पुणे, दिल्ली, बेंगळूर, इंदोर, अहमदाबाद, जयपूर येथे त्याचे आयोजन झाले आहे.

Advertisement

यावर्षी होणाऱ्या स्पर्धेची सुरुवात 4 ऑक्टोबरला उत्तराखंडमध्ये होईल आणि जयपूरमध्ये फायनल चॅम्पियनशिप 6 ते 16 डिसेंबर या कालावधीत होईल. एसएफए ही संस्था देशातील तळागाळातील स्तरावर क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी या चॅम्पियनशिपचे व्यावसायिक आयोजन, आर्थिक साह्या करीत आहे. यावर्षीची स्पर्धा दिल्लीतील विविधक केंद्रावर 5 ते 15 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.