शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
कोल्हापूरः (यड्राव)
इचलकरंजी परिसरातील एका शिक्षकाने बारा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याचे धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. विजय भागवत कुंडलकर वय वर्षे ३६ सध्या राहणार म्हाडा कॉलनी शहापूर मुळगाव कोकलमोहा ( ता.शिरूर कासार, जिल्हा बीड) असे या नराधम शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले, असून त्याच्यावर लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक १६ रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत पीडित मुलगी घरी एकटीच होती. त्याचवेळी शिक्षक विजय कुंडलकर हा घराच्या मागील दरवाज्यातून घरात प्रवेश करून पीडित मुली बरोबर अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणालाही सांगू नको अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही असे धमकीही दिले. परंतु भेदरलेल्या या मुलीने घडलेले सर्व हकीगत त्याच्या आईला सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीच्या आईने थेट शहापूर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दाखल केली. शहापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फिर्याद दाखल करून घेऊन या नराधम शिक्षकाला तात्काळ अटक केली. माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या नराधम शिक्षकाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे करीत आहेत