For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुगळीत 9 वीच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

06:25 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुगळीत 9 वीच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण
Advertisement

पश्चिम बंगालमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Advertisement

वृत्तसंस्था/ हुगळी

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेला अद्याप महिना पूर्ण झालेला नाही. अशास्थितीत कोलकात्याला लागून असलेल्या हुगळीच्या हरिपालमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. नववीची विद्यार्थिनी ट्यूशनमधून घरी परतत असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांना विद्यार्थिनी अर्धनग्न अवस्थेत आढळून आली आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदविल्यावर पोलिसांनी पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप कुठल्याही संशयिताचा शोध लागलेला नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे. बंगाल एका युवा महिला डॉक्टरवर बलात्कार तसेच तिच्या हत्येप्रकरणी भडकलेला असताना हुगळीच्या हरिपालमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. हा भाग ग्रेटर कोलकाता क्षेत्राचा हिस्सा असून तेथेही मुली सुरक्षित नाहीत अशी टीका मालवीय यांनी केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी रुग्णालयाला घेरले आहे. तेथे प्रसारमाध्यमांना रोखले जात आहे. तर स्थानिक तृणमूल नेते या घटनेचे वृत्त समोर येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. महिला आणि मुलींसाठी पश्चिम बंगाल सर्वात असुरक्षित ठिकाण आहे. ममता बॅनर्जी अपयशी ठरल्या असून त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल. बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी ममता सरकारने एकही जलदगती न्यायालय स्थापन केलेले नाही असा आरोप मालवीय यांनी केला.

Advertisement
Tags :

.