खासकिलवाडा रस्त्यालगत गटाराचे काम धिम्या गतीने
12:39 PM Apr 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा शाळा नंबर 4 रस्त्यालगत गटाराचे काम नगरपरिषदेमार्फत सुरू आहे. गेल्या ४ दिवसापासून हे काम धिम्या गतीने सुरु आहे . या रस्त्यावर रहदारीही मोठ्या प्रमाणात असून धिम्या गतीने होत असलेल्या या कामामुळे आणि त्यात अरुंद असलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून त्रास सहन करावा लागतोय . तरी नगरपरिषदेने हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता पूर्णपणे रहदारीस मोकळा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .
Advertisement
Advertisement