महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

क्रांतीनगरात गटारीचे पाणी रस्त्यावर

11:08 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऐन यात्राकाळात पै-पाहुण्यांची गैरसोय : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Advertisement

बेळगाव : क्रांतीनगर परिसरात गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारक, स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. ऐन महालक्ष्मी यात्राकाळात हा प्रकार घडल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. नाले आणि गटारी अस्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतचे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. शुक्रवारी दुपारनंतर काही भागात वळिवाचा पाऊस बरसला. त्यामुळे गटारी, नाल्यांचे घाण पाणी मुख्य रस्त्यावर आले. अशा पाण्यातूनच वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागला. गटारींची स्वच्छता केली नसल्याने हा प्रकार घडला आहे. बेनकनहळ्ळी, गणेशपूरची महालक्ष्मी यात्रा उत्साहात सुरू आहे. त्यामुळे पै-पाहुण्यांची ऊठबस वाढली आहे. अशातच क्रांतीनगर, ज्योतीनगर परिसरात गटारीचे घाण पाणी रस्त्यावर आल्याने ग्राम पंचायतीचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे.

Advertisement

ग्रामपंचायत लक्ष देणार काय?

गटारीतील केरकचरा आणि प्लास्टिकची स्वच्छता करण्यात आली नाही. तसेच गटारीत माती अडकून राहिल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे काहीकाळ वाहनधारकांचीही गैरसोय झाली. ऐन महालक्ष्मी यात्रा काळातच हा प्रकार घडल्याने पै-पाहुण्यांनाही कसरत करतच मार्गक्रमण करावे लागले. त्यामुळे बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत आतातरी गटारी स्वच्छतेकडे लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article