For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक येताच 6-8 पांढऱ्या रंगाचे शर्ट शिवून द्या!

05:34 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक येताच 6 8 पांढऱ्या रंगाचे शर्ट शिवून द्या
Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधींवर ओवैसी यांची खोचक टिप्पणी

Advertisement

निवडणूक एक मोठा गेम असून यात पूर्णवेळ सक्रीय असणे गरजेचे आहे. परंतु काँग्रेस नेते निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वी टेलरकडे जाऊन 6-8 पांढऱ्या रंगाचे शर्ट शिवून द्या, निवडणूक नजीक आल्याचे सांगतात अशी खोचक टीका एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

कोरोना संकट असताना माझा पूर्ण पक्ष आणि तेलंगणा सरकार पूर्णपणे सक्रीय होते. आम्ही दोन हजार ऑक्सिजन सिलिंडर्स पुरविले होते. रुग्णालयांमध्ये बेडची सुविधा वाढविली होती. आम्ही सातत्याने तळागाळात काम करत असताना काँग्रेस पक्ष कुठे होता? निवडणूक येताच काँग्रेस नेते पांढऱ्या रंगाचे शर्ट शिवून घेण्यास सुरुवात करतात, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.

Advertisement

केसीआर हे स्वत: 24 तासांचे राजकारण करतात. तुम्ही 2-4 महिन्यांपूर्वी येऊन आम्ही पराभूत करू असे म्हणता, परंतु असे घडत नाही. निवडणूक एक मोठा खेळ आहे. तुम्ही निवडणुकीच्या काळात येऊन आम्ही नेहरू कुटुंबाचे सदस्य आहोत असे सांगाल, परंतु आता नेहरूंच्या पुण्याईचा लाभ घेण्याचा काळ संपला आहे असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने मुस्लिमांसाठी काहीच केले नाही. ‘युएपीए’ संबंधी काँग्रेसने मोदी सरकारचे समर्थन केले. राहुल गांधी हे जेव्हा भाजप किंवा बीआरएसकडून मी पैसे घेतल्याचे बोलतात, तेव्हा खरोखरच वाईट वाटते. परंतु मी कधीच पैशांसाठी राजकारण केलेले नाही असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

मोहम्मद अझहरुद्दीन राजकारणात अपयशी...

ज्युबली हिल्स मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने मोहम्मद अझहरुद्दीन हे निवडणूक लढवत आहेत. परंतु राहुल गांधी यांनीच माझ्याविरोधात निवडणूक लढवावी असे माझे सांगणे आहे. आमच्या मतदारसंघात योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांनी 5-6 प्रचारसभा घेतल्या आहेत. माझे अझहरुद्दीन यांच्याशी शत्रुत्व नाही. परंतु अझहरुद्दीन हे राजकारणात अपयशी ठरले आहेत. येथे शांतता नांदावी ही आम्हा सर्वांची जबाबदारी असल्याचे उद्गार ओवैसी यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.