For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युरोपमध्ये उष्णतेची प्रचंड लाट

06:22 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
युरोपमध्ये उष्णतेची प्रचंड लाट
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

सध्या युरोप खंडात उष्णतेची प्रचंड लाट आलेली आहे. या लाटेत युरोप खंडातील 800 हून अधिक शहरे सापडली आहेत. यंदाचा उन्हाळा गेल्या काही शतकांमधील सर्वात तीव्र आहे, असे तज्ञांचे मत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी उष्मा असह्या होत असल्याचा कोट्यावधी नागरीकांचा अनुभव आहे. असा उन्हाळा आजवर कधीच अनुभवला नव्हता, अशी प्रतिक्रिया युरोपातील वृद्ध नागरीकांची आहे. मात्र, ही उष्म्याची लाट अल निनो या नैसर्गिक स्थितीमुळे नसून इंधनाच्या अतिउपयोगामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जनाच्या प्रश्नावर तोडगा न काढल्यास तापमानात अशीच वाढ होऊन संपूर्ण निसर्गाचा समतोलच ढासळणार आहे, असा इशारा अनेक पर्यावरण तज्ञ देत आहेत. युरोप हा थंड प्रदेश असल्याने तेथे अशा उष्म्याचा लोकांना अनुभव नाही. त्यामुळे विशेषत: लहान बालकांना तीव्र स्वरुपाचा त्रास होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.