30 वर्षांपर्यंत गंभीर डिप्रेशन, आता जाणवला आनंद
गंभीर डिप्रेशनने पीडित एका इसमाने 30 वर्षांनंतर पहिल्यांदा आनंदाचा अनुभव घेतला आहे. हे एका विशेष ब्रेन पेसमेकर उपकरणामुळे शक्य झाले आहे. हे उपकरण त्याच्या मेंदूच्या विविध हिस्स्यांना सक्रीय करते. मिनेसोटा विद्यापीठाचे डेमियन फेयर यांनी एका व्यक्ती अनेक वर्षांनी पहिल्यांदा आनंदाचा अनुभव घेतल्याचे म्हटले आहे.
या 44 वर्षीय इसमाचे नाव टॉम असून तो वयाच्या 13 व्या वर्षांपासून डिप्रेशनला सामोरा जातोय. 20 पद्धतींपेक्षा अधिक उपचारांनंतरही त्याला कुठलाच स्थायी दिलासा मिळाला नव्हता. परंतु या नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिप्रेशनच्या उपचारात क्रांतिकारक यश मिळाले आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये एंटीडिप्रेसेंट औषधे किंवा थेरपीमुळे रुग्णांना दिलासा मिळत असतो, परंतु काही लोकांमध्ये ‘ट्रीटमेंट रेजिस्टेंट डिप्रेशन’ असते. याचा अर्थ दोन प्रकारच्या एंटीडिप्रेसेंट औषधांनंतरही कुठलाही सुधार न होणे आहे. अशाप्रकरणंमध्ये इलेक्ट्रोकनवल्सिव थेरपी (ईसीटी)ची मदत घेतली जाते, ज्यात मेंदूला कमजोर इलेक्ट्रिक शॉक दिला जातो, परंतु ईसीटी देखील अनेकदा अयशस्वी ठरते.
प्रत्येक व्यक्तीसाठी मेंदूचा एकच हिस्सा लक्ष्य केला जातो, परंतु प्रत्येक मेंदू वेगळा असतो. याचमुळे योग्य क्षेत्रांना टार्गेट न केल्याने दिलासा मिळत नाही. टॉमने औषधे, थेरपी आणि ईसीटीसमवेत 20 हून अधिक उपचार आजमाविले, परंतु कुठलाच लाभ झाला नव्हता, तो आत्महत्या करू इच्छित होता अशी माहिती डेमियन फेयर यांनी दिली.
नवे तंत्रज्ञान : वैयक्तिक ब्रेन पेसमेकर
मिनेसोटा विद्यापीठाच्या संशोधकांनी टॉमसाठी एक वैयक्तिक उपकरण विकसित केले, जे हृदयाच्या पेसमेकरप्रमाणे काम करते. याचे अध्ययन नेचर मेडिसीन नियतकालिकात प्रकाशित झाले असून यात जियाद नाहास, डेमियन फेयर आणि अन्य तज्ञ सामील आहेत.
स्थायी उपकरण
टॉमच्या प्रतिसादाच्या आधारावर इलेक्ट्रोला कॉलरबोनच्या खाली दोन छोट्या बॅटऱ्यांशी जोडण्यात आले. हा मेंदू पेसमेकर दर 5 मिनिटांमध्ये 1 मिनिटासाठी विविध नेटवर्क्सना उत्तेजित करतो. शस्त्रक्रियेच्या 7 आठवड्यांनी टॉमच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार दूर झाले. 9 महिन्यांनी हॅमिल्ट डिप्रेशन रेटिंग स्केलनुसार तो पूर्णपणे बरा होण्याच्या स्थितीत पोहोचला. सुधार दोन वर्षांहून अधिक काळापर्यंत चालला.
परिणाम आणि लाभ
मी आता सर्व भावना अनुभवत असल्याचे टॉमचे सांगणे आहे. तर टॉम आता परिवारासोबत रोड ट्रिपवर जाऊ शकला आणि जीवनाचा आनंद घेत आहे. मनोचिकित्सेत उपचार दुर्लभ आहे, परंतु हे सोपे ठरत चालले आहे. ही पद्धत पूर्वीच्या उपचारांच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे, कारण यात कमी कम्प्युटलेशन सामग्री आणि रुग्णालयात कमी वेळ रहावे लागते असे वक्तव्य जियाद नाहास यांनी काढले आहेत.
भविष्यातील शक्यता अन् आव्हाने
संशोधकांनी आता दुसऱ्या व्यक्तीत ब्रेन पेसमेकर प्रत्यारोपित केले आहे. दोन वर्षांमध्ये डबल-ब्लाइंड क्लिनिकल ट्रायल सुरू होणार आहे. रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायलद्वारे सुरक्षा आणि प्रभावाची पुष्टी व्हायला हवी असे किंग्स कॉलेज लंडनचे मारियो जुरुएना यांनी म्हटले आहे. तर टॉमचे मोठे सॅलेंस नेटवर्क यशाचे कारण ठरू शकते, परंतु सर्व रुग्णांमध्ये असे नसेल. हे तंत्रज्ञान डिप्रेशन कमी करू शकते, कारण डिप्रेशन मेंदूची जैविक समस्या असल्याचे हे सिद्ध करते.
उपकरणाचे कार्यस्वरुप
मेंदू मॅपिंग : संशोधकाहंनी टॉमच्या मेंदूचे 40 मिनिटांचे एमआरआय केले. यात डिप्रेशनशी निगडित चार ब्रेन नेटवर्क्सच्या (डिफॉल्ट मोड, सॅलेंस, एक्शन-मोड आणि फ्रंटोपॅरिएटल) मर्यादांचा शोध लागला. टॉमचे सॅलेंस नेटवर्क, जे बाहेरील उत्तेजनांना संसाधित करते, सामान्य स्वरुपापेक्षा चारपट मोठे होते, हे त्याच्या लक्षणांचे कारण असावे. इलेक्ट्रोड प्रत्यारोपण : शस्त्रक्रियेत 2 छोटे छिद्र पाडुन चार क्लस्टर इलेक्ट्रोड बसविण्यात आले, जे या नेटवर्क्सच्या सीमांवर ठेवण्यात आले. तीन दिवसांनी बाहेरील तारांनी कमजोर करंट पाठविण्यात आले, प्रत्येक नेटवर्कला वेगवेगळे उत्तेजित केल्याने वेगळा प्रभाव पडला.
? डिफॉल्ट मोड नेटवर्क (विचार आणि चिंतेशी निगडित)उत्तेजित केल्यास टॉम आनंदाने रडू लागला.
? सॅलेस आणि अॅक्शन मोड नेटवर्कद्वारे शांततेची अनुभूती झाली.
? फ्रंटोपॅरिएलट नेटवर्कमुळे एकाग्रता वाढली.