For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगेवाडी फाट्यावर एसटी बस व कंटेनरचा भीषण अपघात

10:54 AM Aug 19, 2025 IST | Radhika Patil
योगेवाडी फाट्यावर एसटी बस व कंटेनरचा भीषण अपघात
Advertisement

आठ प्रवासी व बसचालक जखमी

मणेराजुरी :

Advertisement

तासगाव तालुक्यातील योगेवाडी फाट्याजवळ आज सकाळी एसटी बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. गणपतीपुळे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एसटी बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालकासह नऊ जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

अपघात गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला. बसमधील प्रवासी हे जाखापूर (ता. कवठेमहांकाळ) परिसरातील असून ते गणपतीपुळे देवदर्शनासाठी निघाले होते. जोरदार धडकेमुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.

Advertisement

घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना प्रथम तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

अपघातात जखमी झालेले प्रवासी मालन दत्तात्रय पाटील 70 वर्षे, काजल विशाल पाटील 30 वर्षे, रुक्मिणी भीमराव पवार 55 वर्षे, कमल वसंत पवार  60 वर्षे, सुलाबाई गणपतराव पाटील 60 वर्षे, रंजना दिलीप पाटील 45 वर्षे, आदिरा विशाल पाटील 7 वर्षांची मुलगी,शालन वसंत पाटील 55 वर्षे, गोरख तुकाराम पाटील 45 वर्षे (बस चालक)

अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातासंदर्भात तासगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.