लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सात शूटर्सना अटक
दिल्ली पोलिसांची पंजाब-हरियाणात कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स बिश्नोई टोळीवर कारवाई करत त्यांच्या 7 शूटर्सना अटक केली आहे. पंजाब-हरियाणासह इतर राज्यांतून ही अटक करण्यात आली असून आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजस्थानमधील एका बड्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा त्यांचा डाव होता. 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत बाबा सिद्दीकी यांची खळबळजनक हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी ही अटक करण्यात आली आहे. या हत्येची जबाबदारी बिष्णोई टोळीने घेतली आहे.
अटक करण्यात आलेले शूटर्स आरजू बिŽाsईच्या सूचनेवरून राजस्थानमधील एखाद्याला लक्ष्य करण्याचा कट रचत असल्याचा संशय आहे. आरजू बिश्नोई हा सध्या तुऊंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिŽाsईचा निकटवर्तीय मानला जातो. सध्या आरोपींची चौकशी करण्यात येत असून त्यांचा बाबा सिद्दीकी खून प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशभरातील लॉरेन्स बिŽाsई टोळीच्या गुन्हेगारांच्या अ•dयांवर छापे टाकले होते. या छाप्यात या 7 शूटर्सना अटक करण्यात आली. स्पेशल सेल आता बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी या शूटर्सची चौकशी करत आहे. याआधी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीदेखील लॉरेन्स बिŽाsई टोळीच्या मागे लागली आहे.