महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

करासवाडा येथील अपघातात साताऱ्यातील सातजण जखमी

12:19 PM Dec 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिघा गंभीर जखमींवर गोमेकॉत उपचार : गोव्यात पर्यटनासाठी येताना वाटेत अपघात

Advertisement

म्हापसा : करासवाडा, म्हापसा येथे महामार्गावर पार्क केलेल्या कंटेनरला कारची धडक बसून झालेल्या अपघातात सातारा महाराष्ट्रातील 7 पर्यटक जखमी झाले आहेत. त्यातील गंभीर असलेल्या तिघांवर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर घेऊन चालक पसार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अपघातातील जखमींमध्ये गणपत कासित (47), सचिन फाळके (47), उदय भोसले (45), प्रमोद झंजने (47), धर्मेंद्र फाळके (48), प्रमोद जाधव (48) व शंकर आराटे (47) यांचा समावेश आहे. यातील गणपत, सचिन व उदय हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत.  इतर किरकोळ जखमींना जिल्हा इस्पितळात उपचार करून घरी पाठविण्यात आले.

Advertisement

हा अपघात काल मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास घडला. एमएच 05 सीएम 4914 क्रमांकाच्या अर्टिगा कारने सदर पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत होते. ही कार करासवाडा म्हापसा येथे बांदेकर पेट्रोलपंपजवळ पोहचताच कारचालक शंकर आराटे यांना महामार्गावर पार्क केलेल्या कंटेनर ट्रकचा अंदाज आला नाही व भरधाव कार या कंटेनरला मागून धडकली. अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढले आणि प्यायला पाणी, तसेच सोडा दिली. मात्र कारच्या दर्शनी भागात अडकलेल्या दोघांना म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढून म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथून गंभीर जखमी तिघांना बांबोळीतील गोमेकॉत पाठविण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनरसह अज्ञात चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिस  हवालदार नंदू कुडासकर यांनी पंचनामा केला. पोलिस त्या कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article