For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार-ट्रक धडकेत सात जणांचा मृत्यू

06:33 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
कार ट्रक धडकेत सात जणांचा मृत्यू
Advertisement

राजस्थानमधील अपघातात दोन्ही वाहने आगीत भस्मसात

Advertisement

वृत्तसंस्था/ सिकर

राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात रविवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. येथे जयपूर-बिकानेर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार समोर असलेल्या ट्रकला धडकल्यामुळे दोन्ही वाहनांना आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. यादरम्यान प्रवास करणारे सात जण होरपळून जागीच ठार झाले. कारमधील लोक उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये दांपत्यासह दोन मुलांचाही समावेश आहे. अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हृदयद्रावक अपघात रविवारी दुपारी सिकरमधील फतेहपूर बायपासजवळ घडला. भरधाव वेगात आलेल्या एका कारने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्यामुळे मोठा स्फोट होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. स्फोटाचा आवाज ऐकून लोक हादरले. कोणाला काही समजण्यापूर्वीच कार आणि ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग इतकी भीषण होती की लोकांना काहीच करता आले नाही. अपघाताची माहिती मिळताच फतेहपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमन दलालाही पाचारण केले. मात्र, मदत व बचावकार्य सुरू करण्यापूर्वी सात जण होरपळून मृत्यूमुखी पडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.