महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अट्टल चोरट्याकडून सात मोटारसायकली जप्त

11:46 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माळमारुती पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Advertisement

बेळगाव : एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. माळमारुती पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. विठ्ठल सद्याप्पा आरेर (वय 35) रा. शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल असे त्याचे नाव आहे.त्याने बेळगावसह वेगवेगळ्या गावांत मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मोटारसायकली चोरीचा छडा लावताना विठ्ठल पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी व एम. जी. कुरेर, सी. जे. चन्नाप्पगोळ, सी. आय. चिगरी, के. बी. गौरानी, बी. एम. कल्लप्पन्नावर, रवी बारीकर, शिवाजी चव्हाण, मल्लिकार्जुन गाडवी व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद यांनी विठ्ठलला ताब्यात घेतले. बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौक व इतर ठिकाणी रस्त्याशेजारी लावलेल्या मोटारसायकली चोरल्याची कबुली विठ्ठलने दिली. त्याने शहरातील विविध भागातून चोरलेल्या सात दुचाकी जप्त केल्या असून त्याच्यावर एफआयआर दाखल केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article