For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सपा’चे आणखी सात उमेदवार जाहीर

06:16 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सपा’चे आणखी सात उमेदवार जाहीर
Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी  दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाकडून 7 नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये बिजनौरमधून यशवीर सिंग, नगीनामधून मनोज कुमार, मेरठमधून भानू प्रताप सिंग, अलीगढमधून बिजेंद्र सिंग, हाथरसमधून जसवीर वाल्मिक, लालगंजमधून इन्स्पेक्टर सरोज यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर समाजवादी पक्षाने भदोहीची जागा तृणमूल काँग्रेससाठी सोडली आहे.

Advertisement

समाजवादी पक्षाने आपल्या पहिल्या यादीत 16 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये डिंपल यादव, धर्मेंद्र यादव, अक्षय यादव या बड्या नेत्यांच्या जागा जाहीर करण्यात आल्या. ही यादी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीदरम्यान जाहीर करण्यात आली. सपाच्या पहिल्या यादीत 11 ओबीसी, 1 मुस्लीम, 1 दलित, 1 ठाकूर, 1 टंडन आणि 1 खत्री उमेदवारांचा समावेश होता. 11 ओबीसींमध्ये 4 कुर्मी, 3 यादव, 2 शाक्मय, 1 निषाद आणि 1 पाल समाजाच्या उमेदवाराचा समावेश आहे. तर सपाने दुसऱ्या यादीत 11 उमेदवारांची घोषणा केली होती. पक्षाने मुझफ्फरनगरमधून हरेंद्र मलिक आणि गाझीपूरमधून मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारी यांना तिकीट दिले आहे. सपाने शाहजहानपूरमधून राजेश कश्यप, हरदोईमधून उषा वर्मा, मिश्रिख लोकसभा मतदारसंघातून रामपाल राजवंशी, मोहनलालगंजमधून आर. के. चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.