कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बस-ट्रकच्या धडकेत उन्नावमध्ये सात ठार

06:04 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

20 जखमी, तिघे चिंताजनक : ट्रकचालक ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ उन्नाव

Advertisement

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या जोरदार धडकेत बसची एक बाजू पूर्णपणे निकामी झाली असून सदर बाजूला बसलेल्या प्रवाशांना प्राणास मुकावे लागले. उन्नावमधील सफीपूर येथे रविवारी दुपारी झालेल्या या अपघातात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये 5 पुऊष आणि 2 महिलांचा समावेश आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सर्वांना जिल्हा ऊग्णालयात अधिक उपचारार्थ पाठवले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये 27 जण होते. अपघातग्रस्त बस बांगरमाऊहून उन्नावला जात होती. अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करतानाच जखमींवर योग्य पद्धतीने उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणाही त्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article