For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इमारत कोसळून गुजरातमध्ये सात ठार

06:37 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
इमारत कोसळून गुजरातमध्ये सात ठार
Advertisement

सुरतमध्ये सहामजली इमारत जमीनदोस्त

Advertisement

वृत्तसंस्था/ सुरत

गुजरातमधील सुरतमध्ये सहामजली इमारत कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. ही घटना सचिन पाली परिसरात घडली. शनिवारी घडलेल्या या दुर्घटनेसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरू असल्याचे डीसीपी राजेश परमार यांनी सांगितले. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेची सुटका करण्यात आली असून आतापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ढिगारा हटवण्याचे काम रविवारीही सुरू होते. दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली दबले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्यात गुंतलेली पथके ढिगारा हटवून तपासात गुंतली आहेत.

Advertisement

कोसळलेली इमारत फक्त आठ वर्षांची होती. ही इमारत 2016 मध्ये बांधण्यात आली होती. अशास्थितीत बहुमजली इमारतीच्या बांधकामात योग्य बांधकाम साहित्य वापरले गेले नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या इमारतीत सहा कुटुंबे राहत असल्याचे समोर आले आहे. हा भाग सुरत महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. इमारतीचा मालक परदेशात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. इमारत कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अतिवृष्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement
Tags :

.