महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अवजड औद्योगिक युनिटची स्थापना करा

10:57 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आहे. राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर असून, अवजड औद्योगिक युनिटची स्थापना करावी, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी दिले. बेंगळूर येथे एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेवून शुभेच्छा देवून बेळगाव औद्योगिक विकासाबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हा, यासाठी या भागातील उद्योग, व्यवसायांना चालना देण्यासाठी औद्योगिक युनिट स्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. बेळगावमध्ये प्रामुख्याने फौंड्री हा महत्त्वाचा उद्योग व्यवसाय आहे. अन्नधान्य, ऊस, कापूस, तंबाखू, तेलबिया आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. शैक्षणिक हब्ब म्हणून बेळगावचे नाव प्रसिद्ध आहे.

Advertisement

सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे आश्वासन

Advertisement

नामांकित विद्यापीठे, अभियांत्रिकी विद्यापीठे असून, मनुष्यबळाचीही कमतरता नाही.यामुळे येथील तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यानुसार अवजड औद्यागिक युनिट स्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावर केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article