महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात उद्योग स्थापन करा

12:35 PM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांचे गुंतवणूकदारांना आवाहन

Advertisement

पणजी : ‘पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा राज्य अलीकडच्या काळात व्यवसायासाठी अनुकूल धोरणे, व्यवसाय मंजुरीसाठी नियम सुलभता स्थळ म्हणून विकसित झाले असून उद्योजक, गुंतवणूकदारांनी गोव्यात उद्योग स्थापन करावे आणि लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. लवकरच गोव्यात बेतूल येथे ओएनजीसी कॅम्पसमध्ये 5000 आसनक्षमतेचे जागतिक दर्जाचे परिषदगृह उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात भारताचे स्थान वाढविण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून नवी दिल्लीत यशोभूमी, द्वारका, येथे ‘उद्योग समागम’ या ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले.या परिषदेत केंद्रीय वाणिज्य, उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्यासह विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे उद्योगमंत्र्यांनी उपस्थिती लावली. गोव्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी या परिषदेत सहभाग घेताना मंत्री गोयल यांच्यासह इतर राज्यांतील मंत्र्यांशी संवाद साधला.

Advertisement

उद्योग क्षेत्रातील गोव्याची प्रगती आणि दूरदृष्टी यांचे आदानप्रदान केले. या परिषदेत व्यवसाय सुलभीकरण, निर्यात प्रोत्साहन, गतीशक्ती, लॉजिस्टिक, स्टार्टअप यासारख्या क्षेत्रांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. व्यवसाय सुलभतेसाठी 100 टक्के ऑनलाइन मंजुरी देणे, निर्यात प्रोत्साहनासाठी एमएसएमई नियामक आणि तंत्रज्ञान हस्तक्षेपांद्वारे निर्यात चॅनलाइज करणे, गतीशक्ती आणि लॉजिस्टिक्ससाठी गतीशक्ती मास्टर प्लॅनवर पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मॅपिंग करणे, राज्यातील लॉजिस्टिकची किंमत कमी करणे, गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी जागतिक दर्जाचे परिषदगृह व पायाभूत सुविधा स्थापन करणे, राज्यातील स्टार्टअप स्थिती वाढवणे, व्यवसायासाठी अनुकूल धोरणे, तंत्रज्ञान प्रोत्साहन सादर करून व्यवसाय करण्याच्या परिस्थितीला चालना देणे, आदी उपाययोजना आखण्यावर भर देण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article