कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देऊळवाडा गणेश विसर्जन घाटा नजीकचा गाळ स्वखर्चाने उपसला

03:50 PM Aug 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सेवाकार्य ; दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचा पाठपुरावा

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

Advertisement

गणेश चतुर्थी सण एका दिवसावर आला असून आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून गणेश भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. शहरातील देऊळवाडा येथील गणेश विसर्जन घाटावर मोठया प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र ह्याठिकाणी गाळ साचल्याने भाविकांची गैरसोय होत होती. त्यामुळे हा गाळ काढण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत असल्याने मालवण शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यामार्फत स्वखर्चाने हा गाळ काढण्यात आला. यासाठी शिवसेना शहरप्रमुख व कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर व माजी नगरसेवक जगदीश गावकर यांनी पाठपुरावा केला.

देऊळवाडा पुलानजीक मोठ्या प्रमाणात गणपतींचे विसर्जन होते. यात प्रामुख्याने देऊळवाडा, बस स्थानक, सागरी महामार्ग नजिकच्या घरांचा समावेश होतो. याठिकाणी गाळ साचल्याने येथे गणेश मुर्त्या व्यवस्थित विसर्जित होत नव्हत्या. त्यामुळे येथील गाळ काढण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून येथील गाळ काढण्याचे काम पूर्ण करून गणेश भक्त नागरिकांना दिलासा दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व देऊळवाडा येथील जेष्ठ नागरिक दशरथ कवटकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेना प्रवक्ते राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगरसेवक जगदीश गावकर, उपतालुकाप्रमुख अरुण ताेडणकर व बाळू नाटेकर, युवासेना महीला जिल्हाप्रमुख साेनाली पाटकर, महीला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, शहर संघटक राजु बिडये, किसन मांजरेकर, निकीता ताेडणकर, अशाेक ओटवणेकर, प्रभाकर देऊलकर, दीगंबर बगाड, रवि कासले, रवि मालवणकर, शेखर डीचवलकर, सुभाष मालवणकर, शरद गावकर, कमलाकर गांवकर, विनायक खानोलकर, महेश बांदेकर, श्याम आजगावकर, राजु किर, बाबू गांवकर, बाळू मालवणकर, किरण चव्हाण, मिहीर दाभोळकर, गाेपाळ शेलटकर, सुहास वालावलकर, निना मुंबरकर, किरण चव्हाण, भूषण राऊळ, नामदेव घाडी, बाबू कांदळकर, कृष्णा बांदेकर, बाबू आंब्रडकर, संतोष इब्रामपूरकर, रोहन वाळके, पांडया फणसेकर, हरेश फणसेकर, तोषक केळूसकर, प्रमोद मराळ यांच्यासह अन्य स्थानिक नागरिक व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. हे काम मार्गी लागल्याबद्दल स्थानिकांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचे आभार मानले आहेत.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # shivsena # konkan update # news update # malvan
Next Article