महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'सर्व्हर डाऊन’मुळे धान्य वितरणाचा खेळखंडोबा सुरूच

01:24 PM Dec 04, 2024 IST | Radhika Patil
'Server down' continues to disrupt grain distribution
Advertisement

रास्त भाव धान्य दुकानातील 5जी यंत्रणा नावालाच: लाभार्थ्यांना मारावे लागत आहेत वारंवार हेलपाटे

Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

रास्त भाव धान्य दुकानात तासंतास रांगेत उभे राहूनही नंबर येताच सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे ग्राहकांना धान्यासाठी वारंवार हेलमाटे मारावे लागत आहेत. सर्व्हर डाऊनमुळे लाभार्थ्यांना महिन्याच्या अखेरीस धान्य मिळत आहे. जिह्यातील रास्त भाव धान्य दुकानातील नव्याने विकसित झालेली 5 जी यंत्रणा नावालाच आहे की काय? असा प्रश्न लाभार्थ्यांमधून विचारला जात आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे धान्य वितरण व्यवस्था वारंवार कोलमडत आहे.

जिल्ह्यात 1670 रास्त भाव धान्य दुकानांची संख्या आहे. एकूण 5 लाख 75 हजार लाभार्थी कुटूंबे आहेत. जिल्ह्यात एकूण साडेबारा हजार मेट्रीक टन धान्य वितरीत केले जाते. यामध्ये तांदुळ 60 टक्के तर गहू 40 टक्के वितरीत केले जाते. धान्य वेळेत मिळत नसल्यामुळे लाभार्थी व दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. यापुर्वी काही ठिकाणी दुकानदारांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मशिनचा सर्व्हरडाऊन होत असल्यामुळे महिन्यातून चार ते पाच वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. तासंतास रांगेत उभे राहूनही धान्य मिळत नसल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

पुर्वी रास्त भाव धान्य दुकानांमध्ये 2 जी पॉस मशिन होती. यामध्ये वारंवार सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरणाला तासंतास विलंब लागत होता. ग्राहकांना पाच पाच तास ररांगेत उभे राहूनही धान्य मिळत नव्हते. काही ठिकाणी धान्यासाठी पहाटेपासून रात्री उशिरा रांगा लागलेल्या असायच्या. यावर उपाय म्हणून शासनाने जिह्यातील सर्व रास्त भाव दुकानात 5 जी ई-पॉस मशीनची यंत्रणा बसवली. तरीही सर्व्हर डाऊन होत असल्याने ग्राहक व दुकानदारांना पुर्वीसारखाच त्रास सहन करावा लागत आहे.

ठोस उपाययोजना नाहीच

कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्यावतीने वारंवार बिघडणाऱ्या मशिनवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी अनेक दिवसापून केली जात आहे. प्रशासनाकडूनही राज्य शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे नेहमी सागितले जाते. मात्र, यावर ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे लाभार्थी व दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

दुर्गम भागात रेंजच नाही

चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगणबावडा आदी ठिकाणच्या दुर्गम, डोंगराळ भागात तर रेंज नसल्यामुळे ई-पॉस मशिन कामच करत नाही. दुकानदारांना उंच ठिकाणी जाऊन स्वत:च्या मोबाईलमधील नेटचा वापर करून मशिन सुरू करावे लागत आहे. दुर्गम भागात दुकानदारांना मोठी कसरत करून धान्य वितरण करावे लागत आहे. धान्य पदरात पाडून घेण्यासाठी दुर्गम भागातील लाभार्थ्यांना महिना संपेपर्यंत वाट पहावी लागत आहे. अशा भागात शासनाने नेटसेवा उच्च पातळीवर करण्याची गरज आहे.

सर्व्हर डाऊनचा फटका

नवीन 5 जी यंत्रणा बसवूनही सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. शासनाने वरिष्ठ पातळीवर दर्जेदार नेटसेवा विकसित करून द्यावी. धान्य वितरणासाठी एका लाभार्थ्याला अर्धा तास लागत आहे. धान्य वितरणास विलंब होत असल्याने वादावादीचे प्रकार घडत आहेत. धान्य वितरीत करताना दुकानदारांना कसरत करावी लागत आहे.

                                  रविंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघ

पाठपुरावा सुरू आहे

-पॉस मशिनधील सर्व्हर डाऊन व तांत्रिक बिघाडासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. याचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दखल घेतली जात असुन धान्य मिळण्यास उशिर होत असला तरी लाभार्थ्यांनी गोंधळून न जाता सहकार्य करावे.

                                                                             मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article