महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यजमान बांगलादेशचा लंकेवर मालिका विजय

06:20 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नजमुल हुसेन शांतो ‘मालिकावीर’, रिशाद हुसेन सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ चेतोग्राम

Advertisement

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान बांगलादेशने लंकेचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने लंकेचा 4 गड्यांनी पराभव केला. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोला ‘मालिकावीर’ तर रिशाद हुसेनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात लंकेच्या लियानगेचे नाबाद शतक वाया गेले.

या मालिकेत बांगलादेशने पहिला सामना जिंकून आघाडी घेतल्यानंतर लंकेने दुसरा सामना जिंकून बरोबरी साधली होती. या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. लंकेचा डाव 50 षटकात 235 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 40.2 षटकात 6 बाद 237 धावा जमवित हा सामना 58 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी जिंकत मालिका हस्तगत केली.

लंकेच्या डावामध्ये लियानगेने शानदार फलंदाजी करत 102 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 101 धावा झळकाविल्या. मात्र लियानगेला त्याच्या संघ साथिदारांकडून चांगली साथ मिळाली नाही. कर्णधार कुशल मेंडीसने 51 चेंडूत 3 चौकारांसह 29, अविष्का फर्नांडोने 1 चौकारासह 4, निशांकाने 1, समरविक्रमाने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. लंकेचा निम्मा संघ 25 षटकात 117 धावांत तंबूत परतला होता. लियानगे आणि महेश तिक्ष्णा यांनी आठव्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. लियानगेने एका बाजूने संघाची बाजू शेवटपर्यंत सावरली. असालेंकाने 5 चौकारांसह 37, तिक्ष्णाने 15 तर हसरंगाने 11 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 3 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. लंकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 39 धावा जमविताना 2 गडी गमविले. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात 135 धावा जमविताना 5 गडी गमविले. लंकेचे पहिले अर्धशतक 75 चेंडूत, शतक 137 चेंडूत, दीडशतक 198 चेंडूत तर द्विशतक 275 चेंडूत फलकावर लागले. लियानगेने 2 षटकार आणि 11 चौकारांसह 101 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. लंकेने शेवटच्या 10 षटकात 3 गडी गमविताना 61 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे तस्किन अहमदने 42 धावांत 3, रेहमानने 39 धावांत 2, मेहदी हसन मिराजने 38 धावांत 2 तर सरकार आणि रिषाद हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अनामुल हक आणि टी. हसन यांनी बांगलादेशच्या डावाला सावध सुरुवात करुन देताना 50 चेंडूत अर्धशतकी भागिदारी नोंदविली. लंकेच्या कुमाराने हकला झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. कुमाराने बांगलादेशला आणखी एक धक्का पाठोपाठ देताना कर्णधार नजमुल हुसेन शांतोला केवळ एका धावेवर झेलबाद केले. टी. हसन आणि रिदॉय यांनी तिसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भर घातली. कुमाराने रिदॉयला बाद केले. त्याने 22 धावांचे योगदान दिले. कुमाराने मेहमुद्दुलाला मेंडीस करवी झेलबाद केले. त्याने एक धाव जमविली. बांगलादेशची स्थिती यावेळी 4 बाद 113 अशी होती. हसरंगाने टी. हसनला बाद करुन मोठा अडथळा दूर केला. हसनने 81 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 84 धावा झळकाविल्या. मुश्फिकर रहिम आणि मेहदी हसन मिराझ यांनी सहाव्या गड्यासाठी 48 धावांची भर घातली. हसरंगाने मिराझला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. मुश्फिकर रहिम आणि रिशाद हुसेन यांनी सातव्या गड्यासाठी अभेद्य 59 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. रहिमने 36 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 37 तर रिषाद हुसेनने केवळ 18 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 48 धावा झोडपल्या. बांगलादेशच्या डावात 9 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 56 धावा जमविताना 1 गडी गमाविला. त्यानंतर त्याने दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात 177 धावा जमविताना 5 गडी गमाविले. बांगलादेशचे पहिले अर्धशतक 47 चेंडूत, शतक 124 चेंडूत, दीडशतक 185 चेंडूत तर द्विशतक 225 चेंडूत फलकावर लागले. रहिम आणि रिशाद हुसेन यांनी अर्धशतकी भागिदारी केवळ 21 चेंडूत नोंदविली. लंकेतर्फे कुमाराने 48 धावांत 4 तर हसरंगाने 64 धावात 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - लंका 50 षटकात सर्व बाद 235 (लियानगे नाबाद 101, कुशल मेंडीस 29, असालेंका 37, हसरंगा 11, तिक्ष्णा 15, अवांतर 18, टी. अहमद 3-42, रेहमान 2-39, मेहदी हसन मिराझ 2-38, सरकार आणि रिषाद हुसेन प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 40.2 षटकात 6 बाद 237 (अनामुल हक 12, टी. हसन 84, शांतो 1, रिदॉय 22, मेहमुद्दुला 1, रहिम नाबाद 37, मेहदी हसन मिराझ 25, रिशाद हुसेन नाबाद 48, अवांतर 7, कुमारा 4-48, हसरंगा 2-64).

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article