Solapur : चाकूर येथील बोथी रोडवर अपघातांची वाढली मालिका
बोथी रोडवर वाहतूक विस्कळीत, नागरिकांचा प्रशासनावर रोष
चाकूर : चाकूर शहरातील बोथी रोडवर चुकीच्या पार्किंगचा अनियंत्रित थयथयाट आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. शनिवारी झालेल्या अपघाताने नागरिकांचा रोष अधिकच वाढवला आहे. होणारी जीवितहानी टळली हे सुदैव, मात्र रस्त्यांची आणि वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस धोकादायक बनत चालल्याने नागरिक प्रशासनावर ताशेरे ओढत आहेत.
साई हॉस्पिटलसमोर विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अचानक समोर आलेल्या बाहनामुळे दुचाकीस्वार बीस ते तीस फुटांपर्यंत घसरत जाऊन दुभाजकास आपटला.
चुकीच्या ठिकाणी उभी केलेली चारचाकी वाहने, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षांमुळे अपघाताला थेट कारणीभूत ठरले. चालक किरकोळ जखमी झाला असला तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर संतापाचा उद्रेक अपघात झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र येत संताप व्यक्त केला.