‘माँ इंटी बंगारम’चा सीक्वेल येणार
अलिकडेच प्रदर्शित चित्रपट ‘मां इंटी बंगारम’चा सीक्वेल निर्माण केला जाणार आहे. याची पुष्टी चित्रपटाचे लेखक राज निदिमोरु यांनी दिली आहे. चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. सीक्वेलमध्ये दुप्पट मजा आणि दुप्पट एक्साइटमेंट असेल, पुढील काळात याविषयी आणखी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘मां इंटी बंगारम’ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. हा चित्रपट थेट मनाला भिडला असल्याचे राज यांनी सांगितले आहे. नंदिनी रे•ाr यांच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटात समांथा रुथ प्रभू यांच्यासोबत गुलशन देवैया, श्रीमुखी आणि दिगंत मंचले दिसून आले आहेत. या चित्रपटाची निर्मिती समांथा, राज निदिमोरु आणि हिमांशू यांनी मिळून केली आहे. या चित्रपटात आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
1980 च्या काळावर आधारित या कहाणीत समांथाने ‘स्वर्णा’ची भूमिका साकारली आहे, जी स्वत:च्या परिवाराच्या मर्जीच्या विरोधात एका डॉक्टरसोबत विवाह करते. प्रारंभी तिला सासरी प्रेम मिळत नाही, परंतु हळूहळू ती सर्वांची मने जिंकत नाही. परंतु तेव्हाच तिचा भूतकाळ परतून तिच्या जीवनात उलथापालथ घडवू लागतो.
समांथाने अलिकडेच प्रेग्नंसीची घोषणा केली असून ती काही काळासाठी मॅटर्निटी ब्रेक घेणार आहे. समांथा आणि राज निदिमोरु यांचा विवाह डिसेंबर महिन्यात कोईम्बतूर येथील ईशा योग सेंटरमध्ये झाला होता.