For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेंथिलकुमार अंतिम फेरीत

06:22 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेंथिलकुमार अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, बुडापेस्ट

Advertisement

येथे सुरु असलेल्या 43,500 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या बुडापेस्ट खुल्या पीएसए कुपर आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताचा वलावन सेंथिलकुमारने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.

या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आठव्या मानांकित सेंथिलकुमारने आपल्या देशाच्या तृतीय मानांकित वीर छोत्रानीचा 9-11, 11-8, 11-7, 1-11, 12-10 अशा गेम्समध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत सेंथिलकुमारने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाच्या 18 व्या मानांकित इयान योव निगचा 11-2, 11-9, 11-8 असा पराभव केला होता. आता अंतिम फेरीत सेंथिलकुमार आणि हंगेरीचा बेलाझेस फेरकस यांच्यात होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.