झेक स्क्वॅश स्पर्धेत सेंथिलकुमार विजेता
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ब्रेनोमधील झालेल्या 35 हजार अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षिस रकमेच्या झेक खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू वलावन सेंथीलकुमारने विजेतेपद पटकाविले. पीएसए कॉपर स्तरावरील स्पर्धेतील सेंथीलकुमारचे हे दुसरे विजेतेपद आहे.
झेकमधील झालेल्या स्पर्धेतील अंतिम लढतीत 28 वर्षीय सेंथीलकुमारने स्कॉटलंडच्या 31 व्या मानांकीत ग्रेग लोबानचा 13-11, 11-5, 8-11, 11-7 अशा चार गेम्समधील लढतीत पराभव केला. गेल्या ऑगस्टमध्ये बुडापेस्ट खुल्या स्क्वॅश स्पर्धेत सेंथीलकुमारने विजेतेपद मिळविले होते.
241,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या अमेरिकन खुल्या पीएसए प्लॅटिनम स्तरावरील स्क्वॅश स्पर्धेत पहिल्या फेरीत इजिप्तच्या टॉपसिडेड मुस्तफा असलने भारताच्या अभयसिंगचा 11-3, 11-1, 11-7 अशा गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत भारताच्या वीर छोत्रानीचे आव्हान 11-1, 11-6, 11-4 असे संपुष्टात आणले.
