For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बाजारातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सची ९०० अंकांवर उसळी

07:00 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाजारातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सची ९०० अंकांवर उसळी
Advertisement

निफ्टी 237.90 अंकांनी मजबूत : सर्वाजनिक बँकांचे समभाग आघाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

चालू आठवड्यातील चौथ्या दिवशी गुरुवारी भारतीय शेअर बाजारात खालच्या पातळीवरून जोरदार खरेदी झाली. सकाळची सुरुवात सौम्य तेजीने झाली आणि अखेरीस निर्देशांक दिवसातील सर्वोच्च पातळीवर बंद झाला. बाजारातील सर्वांगीण तेजीमध्ये रिअल्टी, एफएमसीजी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स आघाडीवर होते. एनएसईवर, तिन्ही निर्देशांक प्रत्येकी 2 टक्क्यांहून अधिक वाढले.

Advertisement

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 905.01 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 74,151.04 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 237.90 अंकांनी वधारुन निर्देशांक 22,936.75 वर बंद झाला आहे.  कच्च्या तेलाच्या किमती नरम पडल्याने बाजाराला आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 114 डॉलरच्या खाली घसरले आहे. याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी, फेडच्या ऑक्टोबर धोरणात व्याजदर स्थिर ठेवणे आणि मोठ्या कंपन्यांमधील खरेदीमुळेही बाजाराला आधार मिळाला.

एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, बँकिंग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने चार सत्रांतील उच्चांक गाठला आहे. मागील ट्रेडिंग सत्रातील मोठ्या घसरणीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही चांगली सुधारणा दिसून आली आहे.  ते म्हणाले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर न बदलण्याच्या निर्णयानंतर जागतिक बाजारांना सकारात्मक संकेत मिळाले आहेत. याशिवाय, प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या चांगल्या खरेदीमुळेही बाजाराला आधार मिळाला. फेडच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम व्याजदरांशी संबंधित क्षेत्रांवरही दिसून आला.

एफएमसीजी, बँकिंग आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) सोबतच रिअल्टी क्षेत्राच्या शेअर्सनी बाजाराच्या वाढीमध्ये मोठी भूमिका बजावली. सनी अग्रवाल यांच्या मते, येत्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणावर जागतिक घडामोडींवर अवलंबून असेल. कच्च्या तेलाच्या किमती, जगाच्या विविध भागांतील सध्याचा तणाव आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील व्याजदरांबाबतच्या बदलत्या अपेक्षा गुंतवणूकदारांच्या भावनांवर प्रभाव टाकतील. या कारणांमुळे, अल्प कालावधीत शेअर बाजारात चढ-उतार होऊ शकतो. तथापि, भारताच्या अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक अजूनही तुलनेने मजबूत आहेत. अशा दीर्घ कालावधीत देशांतर्गत आर्थिक ताकद भारतीय शेअर बाजाराला आधार देऊ शकते.

  • अदानी पोर्ट             1850
  • कोटक महिंद्रा           457
  • पॉवरग्रिड कॉर्प          260
  • इटरनल                    337
  • बजाज फायनान्स        940
  • स्टेट बँक                    980
  • हिंदुस्थान युनि             1857
  • टायटन                      4444
  • एनटीपीसी                    309
  • भारत इलेक्ट                 372
  • इन्फोसिस                     1143
  • आयटीसी                        263
  • भारती एअरटेल               1974
  • महिंद्रा अॅण्ड महिंद्रा       2900
  • लार्सन अॅण्ड टुब्रो          3842
  • टीसीएस                      2480
  • रिलायन्स इंडस्ट्रीज        1168
  • आयसीआयसीआय        1385
  • एचसीएल टेक            1411
  • बजाज फिनसर्व्ह       1671
  • एशियन पेन्ट्स         2298
  • अल्ट्राटेक सिमेंट       11214
  • अॅक्सिस बँक    1226
  • सनफार्मा         1762
  • टाटा स्टील       169
  • इंट्राग्लोब एव्हीआय        4680
  • विप्रो                 190
  • ब्रिटानिया         4688
  • वरुण बेव्हरेज   413

  • ट्रेन्ट                 2866
  • मारुती सुझुकी  11435
  • टेक महिंद्रा      1770
  • एचडीएफसी बँक  685
  • हिरोमोटो         5107
  • इन्फो एज        1171
  • कमिन्स           4520
  • हिंडाल्को         885
  • आयशर मोर्ट्स  7250
  • श्री सिमेंट         23120
  • एसबीआय लाईफ   1660
  • सिप्ला                  1357
Advertisement
Tags :

.