चौफेर विक्रीमुळे सेन्सेक्सची 879 अंकांवर उसळी
टीसीएस, आयटीसीचे समभाग सर्वाधिक तेजीत : कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई आल्याचा परिणाम
वृत्तसंस्था, मुंबई
कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाईचा कल आणि रुपया मजबूत झाल्यानेही भारतीय भांडवली बाजाराला चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी मोठा आधार मिळाला. तथापि, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि जागतिक अनिश्चितता हे प्रमुख धोके आहेत. मात्र हे असतानाही बाजारात सकारात्मकता राहिल्याचे दिसून आले.
आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड फ्युचर्स अर्ध्या टक्क्याहून अधिक घसरणीसह प्रति बॅरल 104 डॉलरच्या खाली व्यवहार करत आहेत. भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार तेजी दिसून आली. बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक सुमारे दीड टक्क्याच्या वाढीसह बंद झाला. आयटी, एफएमसीजी क्षेत्राने बाजाराच्या वाढीचे नेतृत्व केले. व्यापक बाजारात, मिडकॅप निर्देशांकही चमकला. तर व्होलॅटिलिटी इंडेक्स इंडिया 6 टक्क्यांहून अधिक घसरून 14.35 वर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 879.09 अंकांनी वधारुन निर्देशांक 72,472.33 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 288.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 22,520.45 वर बंद झाला आहे. मिडकॅपमध्ये 1.66 टक्क्यांची वाढ कायम राहिली. त्याच वेळी, इंडिया व्हीआयएक्स 5.37 टक्क्यांनी घसरून 14.46 वर आला.
पीएल कॅपिटलचे मुख्य व्यवसाय अधिकारी (सल्ला आणि व्यवहार) विक्रम कसात म्हणाले की, इंडिया व्हीआयएक्समधील घसरण हे दर्शवते की अल्प मुदतीतील बाजारातील अस्थिरतेची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.
कच्च्या तेलामुळे बळकटीकरण
कच्च्या तेलाच्या किमतींमधील घट आणि रुपयाचे बळकटीकरण यामुळेही बाजाराला आधार मिळाला आहे. दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी सततची विक्री आणि जागतिक अनिश्चितता हे प्रमुख धोके आहेत. गुंतवणूकदारांच्या सावधगिरीमुळे सोने आणि चांदीलाही आधार मिळत आहे.
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी मजबूत कामगिरी केली आहे. परंतु नवीन आठवड्यात व आगामी दसरा-दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील उलाढालीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात होणार असल्याचे संकेत अधिक आहेत. यामुळे येत्या काळात काय बदल होणार आहेत. हे पहाणे अंत्यत आवश्यक ठरणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
