चौथ्या सत्रात सेन्सेक्सची 862 अंकांवर उसळी
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत : आशियातील बाजार सकारात्मक
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात मोठ्या तेजीची नोंद झाली. यामध्ये आशियातील बाजारांमधील तेजीचा लाभ हा भारतीय बाजारातील कामगिरीवर झाला. दुसरी बाब म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला. या सर्व गोष्टींचा सकारात्मक प्रभाव हा भारतीय बाजारांमध्ये झाल्याचे दिसून आले. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 82,794 अंकांवर मजबूतीने उघडला. मात्र अंतिम क्षणी सेन्सेक्स 862.23 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 83,467.66 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 261.75 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 25,585.30वर बंद झाला आहे. सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी 27 कंपन्यांचे शेअर्स घसरणीत रंगात व्यवहार करत होते. तर टायटन, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, ट्रेंट, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि टाटा मोटर्स हे सर्वाधिक तेजीचे होते. यामध्ये 1 ते 3 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली.
बाजारात वाढ होण्याचे कारण काय?
रुपयात मजबूती डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेल्या मजबूत वाढीचा बाजारातील भावनांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. बुधवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 1 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला. यामुळे देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक राहिल्या. गुरुवारीही रुपया स्थिर राहिला. येत्या काही महिन्यांत अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा वाढल्यामुळे रुपया मजबूत झाला आहे.
अमेरिकेसोबत व्यापार करार
भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल वाढत्या आशावादाचा बाजारातील भावनांवर सकारात्मक परिणाम झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही देश सक्रियपणे वाटाघाटी करत आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- नेस्ले 1275
- टाटा कंझ्युमर्स 1149
- कोटक महिंद्रा 2205
- टायटन 3640
- अॅक्सिस बँक 1196
- हिंडाल्को 780
- अदानी पोर्टस् 1478
- महिंद्रा-महिंद्रा 3560
- रिलायन्स 1398
- बजाज ऑटो 9151
- एचडीएफसी बँक 994
- ग्रासिम 2859
- टाटा मोटर्स 396
- ट्रेंट 4793
- एशियन पेंटस् 2409
- विप्रो 253
- आयसीआयसीआय 1417
- आयटीसी 405
- एचसीएल टेक 1515
- भारत इले. 411
- कोल इंडिया 387
- लार्सन टुब्रो 3861
- सिप्ला 1569
- एनटीपीसी 341
- डॉ. रे•िज लॅब्ज 1240
- मारुती सुझुकी 16298
- टाटा स्टील 174
- पॉवरग्रिड कॉर्प 291
- बजाज फिनसर्व्ह 2090
- अल्ट्राटेक सिमेंट 12343
- ओएनजीसी 248
- सनफार्मा 1657
- अपोलो हॉस्पिटल 7833
- एसबीआय 886
- टीसीएस 2970
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इटर्नल 343
- एचडीएफसी लाइफ 742
- श्रीराम फायनान्स 672
- एसबीआय लाइफ 1835
- इन्फोसिस 1471
- जियो फायनॅन्शीयल 312