अंतिम सत्रात सेन्सेक्सची 843 अंकांची उसळी
प्रारंभीच्या घसरणीला ब्रेक लावत बाजार उत्साहासोबत बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी तेजी नोंदवत बंद झाले. मुख्य कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स तब्बल 843 अंकांनी मजबूत झाला. यामध्ये आशियाई बाजारात मिळताजुळता कल राहिला होता.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 843.16 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 82,133.12 वर बंद झाला. दुसऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 219.60 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 24,768.30 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये शुक्रवारी 30 समभागांमधील 26 समभाग तेजीत आणि 4 समभाग प्रभावीत राहिले. तसेच निफ्टीमधील 50 समभागांमधील 41 समभाग वधारले तर 9 घसरणीसह बंद झाले. मुख्य कंपन्यांपैकी भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि आयटीसी यांचे समभाग तेजीत राहिले. तर टाटा स्टील, इंडसइंड बँक, जेएसडब्ल् स्टील आणि बजाज फिनसर्व्ह यांचे निर्देशांक घसरले आहेत. आशियातील बाजारात जपानचा निक्केई 0.95 टक्क्यांनी घसरणीत राहिला, कोरियाचा कॉस्पी 0.50 टक्क्यांनी तेजीत तर शांघाय कम्पोजिट प्रभावीत होत बंद झाला. उपलब्ध डाटानुसार विदेशी गुंतवणूकदारांनी 12 डिसेंबर रोजी 3,560.01 कोटींचे समभाग विकले आहेत. दरम्यान देशातील गुंतवणूकदारांनी 2,646.65 कोटी समभागांची खरेदी केली. अमेरिकेतील डाओजोंस 0.53 टक्क्यांनी घसरुन 43,914 वर बंद झाला.
काही क्षेत्रांची कामगिरी
बाजारात शुक्रवारी एनर्जी, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्राचे समभाग घसरणीत होते. मात्र आयटी आणि बँकिंग क्षेत्रांच्या समभगात चमक राहिल्याचे दिसून आले. भारतीय बाजारात शुक्रवारच्या अंतिम सत्रात तेजीची उसळी प्राप्त करत बाजार बंद झाला आहे. या सकारात्मक कामगिरीचे पडसाद आगामी आठवड्यातील बाजारात दिसेल.