सेन्सेक्स 727 अंकांवर झेपावला
निफ्टी 20 हजारांच्या उंचीवर : बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 331 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्पावर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात बुधवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांनी मजबूत कामगिरी केल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्स 700 पेक्षा अधिक तर निफ्टी हा 20 हजाराच्या टप्प्यावर कार्यरत राहिला होता. सलग दुसऱ्या सत्रातील तेजीची नोंद बुधवारी करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीचा आलेख पाहिल्यास यामध्ये अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक यासारख्या बँकिंगच्या समभागांनी मजबूत कामगिरी केली. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी यांच्या समभागातील तेजीने बाजाराला मोठी ताकद प्राप्त झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीच्या सत्रात बाजारात उत्साह राहिला.
बीएसईमधील लिस्टेट कंपन्यांचे बाजारमूल्य हे 331 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उंचीवर राहिले. या घटनेचा सर्वाधिक फायदा सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांना झाला आहे. तीस समभागांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 727.71 अंकांनी वधारुन निर्देशांक 1.10 अंकांनी वधारुन निर्देशांक 66,901.91 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 206.90 अंकांच्या मजबुतीसह 20,096.60 वर बंद झाला आहे. सेन्सेक्स दिवसभरात 30 कंपन्यांमधील 27 समभाग हे वधारले आहेत. तर तीन कंपन्यांचे समभाग हे प्रभावीत होत बंद झाले.
निफ्टी 18 सप्टेंबरनंतर 20 हजारांवर
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 1.04 टक्क्यांनी वधारुन जवळपास 20 हजारांच्या वरती पोहोचण्यासाठी 18 सप्टेंबरनंतर आज पहिल्यांदा अशी कामगिरी केली असल्याची नोंद झाली आहे. निफ्टीमधील 40 कंपन्यांचे समभाग हे वधारले तर 10 हे नुकसानीत राहिले आहेत.
दिग्गज कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँकेचे समभाग हे सर्वाधिक 3.92 टक्क्यांनी वधारले. तर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, विप्रो, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोर्ट्स, टीसीएस यासारख्या समभागांमध्ये तेजी राहिली आहे. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया हे सर्वाधिक नुकसानीत राहिलेत. यासह टायटन, बजाज फायनान्स व अल्ट्राटेक सिमेंट हे प्रभावीत होत बंद झाले.
या कारणांमुळे बाजारात उत्साह
? अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वालर यांनी आगामी महिन्यात व्याजदरात कपात करणार असल्याचे म्हटले. यामुळे महागाईत नरमाई राहणार असल्याचे संकेत दिले.
? अमेरिकन ट्रेझरी यील्डमधील घसरणीमुळे विदेशी गुंतवणूकादारांकडून बाजारात खरेदीचा कल
? बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 331 लाख कोटी रुपयांसह विक्रमी टप्प्यावर
? बँक व आर्थिक सर्व्हिस या क्षेत्रांमध्ये तेजी मजबूत