For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतिम सत्रात सेन्सेक्सची 820 अंकांची भरारी

06:10 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंतिम सत्रात सेन्सेक्सची 820 अंकांची भरारी
Advertisement

निफ्टीची झेप 24,300 वर स्थिरावली : जागतिक बाजारात मिळताजुळता कल

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत कामगिरी करत बंद झाले. यामध्ये गुरुवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीमधील निर्णयामुळे शेअर बाजारात नाराजीचा सूर राहिला होता. मात्र ही नाराजी दूर होत पुन्हा एकदा दोन्ही निर्देशांक भक्कमपणे सावरले असल्याचे दिसून आले.

Advertisement

जागतिक बाजारांमधील मिळताजुळता कल राहिल्याचा सकारात्मक लाभ भारतीय बाजारात राहिला. चालू आठवड्याची सुरुवात ही मोठ्या घसरणीसोबत झाली होती. यामध्ये अमेरिकेतील बेरोजगारीच्या दरातील घसरण व बँक ऑफ जपान यांनी वाढविलेला व्याजदर या स्थितीतही बाजार सावरला असून सेन्सेक्स व निफ्टीत चांगली तेजी राहिली.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी दिवसअखेर 819.69 अंकांच्या भरारीसोबत निर्देशांक 79,705.91 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 250.50 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 24,367.50 वर बंद झाला आहे.

निफ्टीमधील 50 समभागांपैकी पहिल्या पाच समभागांमध्ये दोन समभाग हे वाहन क्षेत्रातील राहिले आहेत. यात आयशर मोटर्सचे समभाग 5.68 टक्के तर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग 3.05 टक्के, श्रीराम फायनान्स 2.88, टाटा मोटर्स 2.81 आणि टेक महिंद्रा 2.67 टक्क्यांसोबत वधारले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये घसरणीत एचडीएफसी लाईफचे नाव राहिले आहे. यात एचडीएफसी लाईफ 1.09 टक्क्यांनी प्रभावीत राहिले. तसेच कोटक बँक 0.16 टक्के, मारुती सुझुकी 0.12 टक्के आणि सनफार्माचा समभाग 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

जागतिक बाजारांमध्ये शुक्रवारी टोकीयो, सियोल आणि हाँगकाँगचे समभाग वधारले आहेत. यासोबतच शांघाय घसरणीसह बंद झाला आहे. तर युरोपीयन बाजारांमध्ये सकारात्मक कल राहिला होता. या सर्व घडामोडींचा भारतीय बाजाराला लाभ झाला असला तरी आगामी आठवड्यात बाजार कोणता कल घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.