For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतिम सत्रात सेन्सेक्सची मोठी पडझड

06:53 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतिम सत्रात सेन्सेक्सची मोठी पडझड
Advertisement

जागतिक घडामोडींचा परिणाम : निफ्टीचीही पडझड

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी  नकारात्मक संकेतामुळे जागातिक बाजारात दबावाचे चित्र राहिले होते. या परिणामुळे भारतीय बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी यांची मोठी पडझड झाली.   दरम्यान आयटी शेअर्समध्ये वाढ झाली असली तरी, बँकिंग, ऑटो आणि एफएमसीजी सारख्या क्षेत्रातील विक्रीचा दबावही बाजारावर राहिला होता.

Advertisement

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या दिग्गज निर्देशांकांमधील कमकुवतपणाचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. यावेळी अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे, गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत आणि अधूनमधून नफा बुक करत आहेत.

प्रमुख कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 82,246 अंकांवर जवळजवळ स्थिर होत उघडला, मात्र लगेचच घसरला. बाजारात विक्रीचे वर्चस्व राहिले, 961.42 अंकांनी किंवा 1.17 टक्क्यांनी घसरून 81,287.19 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 317.90 अंकांनी घसरुन निर्देशांक 25,178.65 वर बंद झाला.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, मारुती सुझुकी, भारती एअरटेल आणि बजाज फिनसर्व्ह हे सर्वात मोठे नुकसान झाले. दुसरीकडे, एचसीएल टेक, ट्रेंट लिमिटेड व इन्फोसिसने नफा टिकवून ठेवण्यात यश मिळवले. व्यापक बाजार देखील प्रमुख निर्देशांकांप्रमाणेच घसरला. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 1.14 टक्के आणि 1.10 टक्के घसरणीसह बंद झाले.

रिअॅल्टी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकांमध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली. अनुक्रमे 2.3 टक्के आणि 2.1 टक्के घसरली. जागतिक बाजारपेठा: शुक्रवारी आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र वातावरण राहिल्याचे दिसून आले आहे.

Advertisement
Tags :

.