For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतिम सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला

06:55 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंतिम सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला
Advertisement

बँकिंग व वाहन समभागांमध्ये लिलाव : अखेर चार दिवसांच्या घसरणीला विराम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात मागील चार सत्राच्या कामगिरीत राहिलेल्या घसरणीला अखेर अंतिम सत्रात शुक्रवारी पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले.  जागतिक बाजारांमधील नकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारावर जाणवला नाही. बाजार शुक्रवारी मोठ्या कामगिरीसह बंद झाला. यामध्ये सेन्सेक्स तब्बल 600 अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीने 151 अंकांची तेजी प्राप्त केली होती. यासोबतच विदेशी गुंतवणूकदारांमुळे निर्देशांकांमध्ये तेजी प्राप्त करण्यास मदत राहिली होती.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसईमधील 30 समभागांमधील निर्देशांकांच्या मदतीने सेन्सेक्स दिवसअखेर 599.34 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.83 टक्क्यांसोबत 73,088.33 वर बंद झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 151.15 अंकांसोबत निर्देशांक 22,147.00 वर बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये इराण व इस्रायल यांच्यात हल्ला झाल्याच्या घटनेमुळे काहीसे तणावाचे वातावरण बाजारात राहिले होते. मात्र दुपारपर्यंत बाजारात सकात्मक स्थिती राहिल्याने बाजाराला बळ मिळाले.

प्रमुख कंपन्यांमध्ये शुक्रवारी 30 समभागांमध्ये बजाज फायनान्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती सुझुकी, विप्रो, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आण आयटीसी यांचे  समभाग वधारले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा कंन्सलटन्सी, टाटा मोर्ट्स आणि इन्फोसिस यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत.

जागतिक बाजार नुकसानीत

आशियातील बाजारांमध्ये सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँग यांची कामगिरी नकारात्मक राहिली होती. तर युरोपीय बाजार प्रभावीत झाला. गुरुवारी अमेरिकन बाजारात घसरण राहिली होती. जागतिक बाजारात कच्चे तेल ब्रेंट क्रूड 0.55 टक्क्यांनी वधारुन 87.62 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

.................................

Advertisement
Tags :

.