For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोमवारी सेन्सेक्स 445 अंकांनी वधारला

06:53 AM Dec 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोमवारी सेन्सेक्स 445 अंकांनी वधारला
Advertisement

एफएमसीजी, पीएसयु निर्देशांक घसरणीत: रुपया नीचांकी स्तरावर

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी व डिसेंबरमधील पहिल्या सत्रात भारतीय शेअरबाजार तेजीसह बंद होण्यात यशस्वी ठरला. दिवसभरात चढ उतार बाजारात असताना सेन्सेक्स 445 अंकांनी वधारत बंद झाला. याचदरम्यान बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत 84.73 या सर्वाधिक नीचांकी स्तरावर रुपया पोहचला होता.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 445 अंक वाढत 80,248 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 144 अंकांनी वाढत 24,276 अंकांवर बंद झाला. एफएमसीजी आणि पीएसयु या क्षेत्रांचे निर्देशांक नुकसानीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 21 समभाग हे तेजीसोबत तर 9 समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले होते. एनएसईवर निफ्टीमधील 50 पैकी 31 समभागांमध्ये तेजी पाहायला मिळाली. याउलट 18 समभाग मात्र घसरणीसोबत बंद झाले. समभागांच्या कामगिरीवर नजर फिरवल्यास रिलायन्स इंडस्ट्रिज, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीसोबत कार्यरत होते. तर दुसऱ्या बाजुला एनटीपीसी, लार्सन टुब्रो, कोटक महिंद्रा बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या समभागांनी बाजाराला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. रियल्टी, फार्मा, मेटल, ऑटो, मीडिया यांचे निर्देशांक 1 टक्का इतके वाढले होते. बीएसई स्मॉलकॅप व मिडकॅप निर्देशांकही 1 टक्का वाढत बंद झाले.

जपानचा निक्केई 0.80 टक्के तेजीसोबत कार्यरत होता तर कोरीयाचा कोस्पी 0.058 टक्के घसरणीसह व्यवहार करत होता. चीनचा शांघाय कम्पोझीट 1.13 टक्के तेजीसोबत बंद झाला होता. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 29 नोव्हेंबरला 0.42 टक्के वाढत बंद झाला होता. नॅसडॅकही 0.83 टक्के वाढला होता. एनएसईकडून प्राप्त माहितीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी 29 नोव्हेंबर रोजी 4383 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले होते.

Advertisement
Tags :

.