For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौथ्या सत्रात सेन्सेक्स वधारला, निफ्टीचा प्रवास घसरणीसह बंद

07:00 AM Aug 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
चौथ्या सत्रात सेन्सेक्स वधारला   निफ्टीचा प्रवास घसरणीसह बंद
Advertisement

टाटा समूहाच्या समभागांमधील सुधारणेनंतर सेन्सेक्समध्ये तेजी, सेन्सेक्स 113 अंकांनी वधारत बंद

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात पुन्हा एकदा टाटा समूहातील सकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतीय बाजावर झाला असून सेन्सेक्समध्ये तेजी राहिली आहे, तर निफ्टीमधील घसरण भारतीय बाजारांसाठी कमकुवत सुरुवातीचे संकेत देत राहिले. दरम्यान आशियाई बाजारांमध्ये तेजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण राहिल्याचे दिसून आले. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 113.61 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 78,079.96 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 40.10 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 24,395.85 वर बंद झाला आहे. टाटा ग्रुप आणि चांगली कामगिरी करणाऱ्या समभागांमध्ये गुरुवारी खालच्या पातळीवरून चांगली सुधारणा दिसून आली. टाटा समूहाच्या शेअर्सनी बाजारात उत्साह भरण्याचे काम केले. निफ्टीमधील टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्सचे शेअर्स 2 ते 2.6 टक्क्यांनी वधारले. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसच्या शेअर्समध्येही 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

Advertisement

धातू क्षेत्राची घसरण

क्षेत्रीय कामगिरी पाहता, रिअल्टी, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्र तेजीमध्ये आघाडीवर आहेत. सदरचे निर्देशांक अर्ध्या टक्क्याने वाढून बंद झाले. दुसरीकडे, सातत्यपूर्ण वाढ दर्शवणारे धातू क्षेत्र हे गुरुवारी अधिक घसरले आहे. निफ्टी धातूचा निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला. मिडकॅपमध्ये किंचित घसरण, स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली आहे. व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.15 टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.27 टक्क्यांनी वाढला आहे.

या आयपीओंवर एक नजर

क्रेडेंट कनेक्टचा आयपीओ 13 ऑगस्टपासून गुंतवणूकीसाठी खुला झाला. हा 93.90 कोटी रुपयांचा बुक-बिल्ड इश्यू आहे. बिहारी लाल इंजिनिअरिंग आणि शिपरॉकेट आयपीओसाठी गुंतवणुकीचा दुसरा दिवस होता. क्यू अँड टी फूड्स आणि प्रमोदिनी मेडिकेअर आयपीओंसाठीही दुसऱ्या दिवशी बोली लावता येईल. मिल्की मिस्ट डेअरी फूड आयपीओसाठी गुंतवणूकीचा शेवटचा दिवस आहे. हा 1,553 कोटी रुपयांचा बुक-बिल्ड इश्यू आहे. तसेच शॅम फोम आणि फॅसिनेट टेक्सटाइल्स आयपीओसाठीही गुंतवणूकीचा शेवटचा दिवस आहे.

  • इंटरग्लोब एव्ही     5390
  • एनटीपीसी            345
  • भारत इले.           412
  • लार्सन-टुब्रो        4070
  • हिंदुस्थान युनि     2093
  • इटर्नल               318
  • टेक महिंद्रा       1650
  • बजाज फिनसर्व्ह 2036
  • एशियन पेन्ट्स   2756
  • ट्रेन्ट                3014
  • एचसीएल टेक 1374
  • आयटीसी         279
  • टीसीएस           2372
  • बजाज फायनान्स 1090
  • कोटक महिंद्रा    394
  • सनफार्मा          1942
  • महिंद्रा-महिंद्रा 3427
  • भारती एअरटेल 1942
  • पॉवरग्रिड कॉर्प 269
  • एयू स्मॉल फायनान्स 1105
  • इंडसइंड बँक 1022

  • आयसीआयसीआय 1410
  • टायटन                5050
  • रिलायन्स इंडस्ट्रीज 1316
  • अल्ट्राटेक सिमेंट  11750
  • इन्फोसिस           1169
  • टाटा स्टील           184
  • एचडीएफसी बँक 727
  • मारुती सुझुकी 13896
  • अॅक्सिस बँक 1225
  • स्टेट बँक        1079
  • अदानी पोर्ट    1664
  • हिंडाल्को      1046
  • श्री सिमेंट      25076
  • अंबुजा सिमेंट 419
  • टीव्हीएस मोटर 4314
  • फेडरल बँक 352
  • विप्रो           183
  • हिंदुस्थान अॅग्रो 4941
  • कमिन्स     5338
  • लुपिन        2261
Advertisement
Tags :

.