For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्लॅक मंडे....सेन्सेक्स तब्बल 1100 अंकांनी कोसळला, निफ्टीही दबावात

06:43 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्लॅक मंडे    सेन्सेक्स तब्बल 1100 अंकांनी कोसळला  निफ्टीही दबावात
Advertisement

गुंतवणूकदारांचे 8.77 लाख कोटी स्वाहा : कच्चे तेल वधारले, जागतिक तणावाचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचेही अवमूल्यन झालेले दिसून आले. यापार्श्वभूमीवर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1100 अंकांनी तर निफ्टी 360 अंकांनी कोसळत बंद झाला.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक तब्बल 1124 अंकांनी कोसळत 72771 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 360 अंकांनी कोसळत 22780 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी बँक निर्देशांकही मोठ्या पडझडीत दिसून आला. हा निर्देशांक 1108 अंकांनी घसरत 54471 अंकांवर बंद झाला. सोमवारी एनएसईवर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.63 टक्के व निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकातही 1.85 टक्केची लक्षणीय घसरण पाहायला मिळाली.

 घसरणीतले समभाग अधिक

शेअरबाजारात सोमवारी पहिल्या दिवशी मोठी घसरण होती. यात घसरणीत असलेले समभागच अधिक होते. निफ्टीतही नुकसानीसहचे कंपनीचे समभाग खूप होते. डॉ. रे•िज लॅब्ज, इन्फोसिस व एचडीएफसी लाइफ यांचे समभाग मात्र वधारत बंद झाले. दुसरीकडे अपोला हॉस्पिटल, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, मारुती सुझुकी, टीसीएस, कोटक बँक, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, एसबीआय लाइफ, कोल इंडिया, टाटा स्टील, ग्रासिम, नेस्ले, एनटीपीसी, विप्रो, ट्रेंट, श्रीराम फायनान्स, रिलायन्स, हिंडाल्को, अदानी पोर्ट, लार्सन टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प, जियो फायनान्स, टायटन, महिंद्रा आणि महिंद्रा, ओएनजीसी, टाटा मोटर्स पीव्ही, अदानी एंटरप्रायझेस, आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, इटर्नल, अल्ट्राटेक सिमेंट, सिप्ला, इंडिगो यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले होते. मिडकॅपमध्ये यस बँक, बँक ऑफ इंडिया, वोडाफोन आयडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडस टॉवर्स यांचेही समभाग कमकुवत होत बंद झाले.

सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक दबावात

विवित्र क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी सोमवारी निराशादायक दिसून आली. यामध्ये एनर्जी व एफएमसीजी यांचे निर्देशांक सर्वाधिक घसरणीत राहिले होते. एनर्जी निर्देशांक 747 अंकांनी घसरत 36693 अंकांवर तर एफएमसीजी 676 अंकांनी घसरुन 45264 अंकांवर बंद झाला. याशिवाय ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, फायनॅन्शीयल, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचेही निर्देशांक कमकुवत कामगिरीसोबत बंद झाले.

घसरणीचे कारण?

शेअर बाजारातील लक्षणीय घसरणीला अनेक घटक कारणीभूत ठरले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवा शांतता प्रस्ताव फेटाळला. यानंतर, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याबाबत नवीन अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 105 डॉलरवर पोहोचली. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढल्याने त्यांनी विक्रीवर जोर दिला.

Advertisement
Tags :

.