For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

विक्रीच्या दबावात सेन्सेक्स 906 अंकांनी कोसळला

06:40 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
विक्रीच्या दबावात सेन्सेक्स 906 अंकांनी कोसळला

गुंतवणूकदारांचे 13.5 लाख कोटींचे नुकसान

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी मोठी घसरण नोंदवत बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचा तेजीचा प्रवास थांबल्याचे दिसून आले. यामध्ये स्मॉलकॅप व मिडकॅप यांच्या निर्देशांकांनी प्राप्त केलेली मोठी घसरण व मोठ्या प्रमाणामधील दबावाचा फटका हा बाजाराला बसल्याचे दिसून आले.

Advertisement

मुख्य कंपन्यांच्या मदतीने भारतीय शेअर बाजारात बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स 900 अंकांपेक्षा अधिकने प्रभावीत झाला, तर दलाल स्ट्रीटवर विक्रीच्या कारणास्तव मोठ्या विक्रीने गुंतवणूकदारांना जवळपास 13.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी बीएसई सेन्सेक्स 906.07 अंकांनी घसरुन निर्देशांक जवळपास 1.23 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह 72,761.89 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 338.00 म्हणजे 1.51 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 21,997.70 वर बंद झाला आहे.

एस अॅण्ड पी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांक बुधवारी 1 टक्क्यांपेक्षा अधिकने घसरला आहे. यासह युटिलटी, एनर्जी आणि धातू या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मोठ्या नुकसानीत राहिलेत. तर विदेशी गुंतवणूकदारांमधील विक्रीने निराशेमध्ये मोठी वाढ केली.

जागतिक बाजारांमध्ये तेजीच्या विरुद्ध अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये मध्यम आणि लहान कंपन्यांच्या समभागांमध्ये उच्च पातळीवरुन बाजारात घसरण राहिली आहे. दैनंदिन वापरामधील साहत्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. अन्य स्थिती मात्र बाजाराला पोषक अशी राहिली नसल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी स्पष्ट  केले आहे.  सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक 7 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. तर एनटीपीसी, टाटा स्टील, टाटा मोर्ट्स, भारती एअरटेल, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

Advertisement
Tags :
×

.