For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेन्सेक्स सोमवारी दमदार तेजीसोबत बंद

06:30 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
सेन्सेक्स सोमवारी दमदार तेजीसोबत बंद
Advertisement

सेन्सेक्स 941 अंकांनी वधारला : बँकिंग समभाग तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार 941 अंकांच्या दणदणीत वाढीसह बंद होण्यामध्ये यशस्वी झाला. जागतिक सकारात्मक वातावरणासह इतर कारणांमुळे शेअर बाजार तेजीसमवेत बंद झाला.

Advertisement

सोमवारी दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 941 अंकांच्या तेजीसमवेत 74671 अंकांवर बंद होण्यात यशस्वी झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील दमदार कामगिरीसोबत बंद झाला होता. निफ्टी 223 अंकांच्या मजबुतीसोबत 22,643 च्या स्तरावर बंद झाला होता. आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक 4.7 टक्के वाढीसोबत बंद झाले. यांना एसबीआय, इंडसइंड बँक यासारख्या समभागांनी तीन टक्के तेजीसह मजबूत साथ दिली. सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, कोटक बँक आणि एनटीपीसी या कंपन्यांचे समभागदेखील मजबूत तेजीसोबत व्यवहार करत होते. दुसरीकडे एचसीएल टेकचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले. एचसीएल टेकचे समभाग पण 5.9 टक्के इतके घसरले होते. यासोबत अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, एचडीएफसी लाइफ, एलटीआय माइंड ट्री, हिरो मोटोकॉर्प आणि डिव्हिज लॅब यांचे समभागसुद्धा नुकसानीसह बंद झालेले होते.

सोमवारी भारतीय शेअर बाजारात दमदार तेजी नोंदवली जात असताना निफ्टी बँक निर्देशांकाने 49,388 ची सर्वकालीन तेजी अनुभवली होती. निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले होते. निफ्टी मिडकॅप 100, स्मॉलकॅप, निफ्टी फार्मा, एफएमसीजी आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस यांचे निर्देशांक चांगल्या तेजीसोबत व्यवहार करत होते. उत्तम तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेचे सोमवारी बाजार मूल्य 8 लाख कोटी रुपये पार गेले होते. 52 आठवड्यानंतर बँकेचा समभाग 1155 रुपयांच्या स्तरावर पोहोचला होता.

Advertisement
Tags :

.