आरबीआय निर्णयानंतर सेन्सेक्स-निफ्टीत नाराजी
आरबीआयकडून 9 व्यांदा रेपोदर स्थिर : एशियन पेन्ट्स, इन्फोसिस, पॉवरग्रिड कॉर्प नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वात आरबीआयची पतधोरण समितीची बैठक 8 ऑगस्ट रोजी गुरुवारी संपन्न झाली. यामध्ये आरबीआयने सलग 9 व्यांदा रेपोदरात कोणताही बदल न करता तो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या निर्देशांकांनी नाराजीचा सूर प्राप्त करत आपला तेजीचा प्रवास थांबविला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 581.79 अंकांच्या घसरणीसह 0.73 टक्क्यांसोबत निर्देशांक 78,886.22 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 180.50 अंकांसोबतच्या घसरणीसह निर्देशांक 24,117.00 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 7 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयटीसी आणि इंडसइंड बँक यांचे समभाग हे तेजीत पहिल्या पाच नंबरवर राहिले आहेत. यासह सनफार्मा व अॅक्सिस बँक यांची कामगिरीही तेजीत राहिली.
अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 23 समभाग हे प्रभावीत होत बंद झाले. यामध्ये एशियन पेन्ट्स, इन्फोसिस, पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग घसरणीत पहिल्या पाचमध्ये राहिले आहेत. यासोबतच एचसीएल टेक, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, बजाज फायनान्स, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक बँक, टेक महिंद्रा, स्टेट बँक आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वात झालेल्या आरबीआयच्या बैठकीत तब्बल 9 व्यांदा रेपोदर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयानंतर शेअर बाजारात मात्र सकाळी प्राप्त केलेली तेजी गमावत बाजार बंद झाला आहे. या गोष्टींचा परिणाम हा दिवसभर बाजारात नकारात्मक राहिल्याचे दिसून आले आहे. दरम्यान जागतिक बाजारांमध्ये अमेरिकेतील नोकऱ्यांसंदर्भातील डेटाबाबत काळजी व्यक्त होत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याचे संकेतही निर्माण होत असल्याने भारतीय बाजारात काहीसे दबावाचे चित्र निर्माण होण्याची शक्यताही अभ्यासक व्यक्त करत आहेत. जागतिक बाजारांमध्ये आशियातील बाजारात शांघाय आणि हाँगकाँगचा बाजार वधारला आहे. तर सियोल व टीकीओचा बाजार प्रभावीत झाला. युरोपीयन बाजारात नकारात्मक स्थिती राहिल्याने याचा प्रभाव भारतीय बाजारात झाला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एचडीएफसी लाइफ 710
- टाटा मोटर्स 1041
- एसबीआय लाइफ 1706
- एचडीएफसी बँक 1642
- सिप्ला 1569
- भारती एअरटेल 1451
- आयटीसी 494
- डॉ. रे•िज लॅब्ज 6938
- इंडसइंड बँक 1347
- सनफार्मा 1737
- अॅक्सिस बँक 1138
- महिंद्रा आणि महिंद्रा 2682
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एलटीआय माइंट्री 5338
- ग्रासिम 2544
- एशियन पेंटस् 3005
- इन्फोसिस 1743
- पॉवरग्रिड कॉर्प 342
- अपोलो हॉस्पिटल 6541
- अल्ट्राटेक सिमेंट 11258
- लार्सन टुब्रो 3553
- टाटा स्टील 150
- एचसीएल टेक 1557
- डिव्हीस लॅब्ज 4834
- जेएसडब्ल्यू स्टील 887
- एनटीपीसी 407
- विप्रो 487
- बजाज फिनसर्व्ह 1540
- ओएनजीसी 322
- श्रीराम फायनान्स 2872
- टाटा कन्झु. 1178
- अदानी पोर्टस् 1519
- ब्रिटानिया 5744
- हिरो मोटोकॉर्प 5158
- बीपीसीएल 338
- हिंडाल्को 614
- कोल इंडिया 523
- नेस्ले 2489
- मारुती सुझुकी 12218
- रिलायन्स 2898
- टायटन 3296
- बजाज फायनान्स 6582