For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेन्सेक्स-निफ्टीचा नव्या विक्रमाला स्पर्श

06:27 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
सेन्सेक्स निफ्टीचा नव्या विक्रमाला स्पर्श
Advertisement

बाजार घसरणीसोबत बंद : अशोक लेलँडचा समभाग वधारला

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवड्यातील पहिल्या दिवशी तेजीत असणारा शेअरबाजार शेवटच्या क्षणी काहीशा घसरणीसोबत बंद झाला. याचदरम्यान सेन्सेक्स व निफ्टी यांनी नव्या विक्रमी पातळीवर पोहचण्यात यश मिळवले होते. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी अशोक लेलँडचा समभाग बाजारात सर्वाधिक वाढीसह बंद झाला होता.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक  19 अंकांनी घसरत 75390 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 24 अंकांनी घसरत 22932 अंकांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग घसरणीत होते तर डिव्हीस लॅब्जचे समभाग मात्र वधारासह बंद झाले होते. सोमवारी दिवसभरातील सत्रात शेअरबाजारात खूप चढ-उतार पाहायला मिळाला. चौथ्या तिमाहीतील दमदार नफ्याच्या कामगिरीमुळे अशोक लेलँडचे समभाग 6 टक्के वाढत बंद झाले. शेअरबाजारातील तज्ञांच्या मते शेअर बाजारात बंपर तेजी असून नफावसुली करण्याची हीच योग्य वेळ आहे. दिवसभराच्या सत्रात तेजीतच राहिलेला बाजार अखेरच्या क्षणी नुकसानीसह बंद झाला. इरकॉन इंटरनॅशनल, इंजिनियर्स इंडिया, एचडीएफसी बँक, लार्सन टुब्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंटस् यांचे समभाग उत्तम तेजीत होते. टीसीएस, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ओएनजीसी आणि विप्रो यांचे समभाग मात्र नुकसानीसोबत बंद झाले.

विक्रमाला गवसणी

याचदरम्यान सोमवारी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजार नव्या विक्रमावर पोहचला होता. निफ्टीने 23100 अंकांची आणि बीएसई सेन्सेक्सने 75,600 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती.

डिव्हीस लॅब्ज, इंडसइंड बँक, एलटीआय माइंट्री, अदानी पोर्टस्, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि लार्सन यांचे समभाग बंपर तेजीत हेते तर अदानी एंटरप्रायझेस, विप्रो, ओएनजीसी, ग्रासिम, आयशर मोटर्स आणि सन फार्मा यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले.

Advertisement
Tags :

.