For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स-निफ्टी मजबूत

06:40 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स निफ्टी मजबूत

आठवड्यातील शेवटचे सत्र तेजीसह बंद : सेन्सेक्स 191 अंकांनी वधारले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई  

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील झालेल्या सकारात्मक घटानांचा फायदा शेअर बाजाराला झाल्याचे दिसून आले.

Advertisement

विविध घडामोडींमध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 191 तर निफ्टी 85 अंकांनी मजबूत राहिले होते. सुरुवातीला बाजारामध्ये सेन्सेक्स 200 पेक्षा अधिकच्या अंकांनी घसरणीत राहिला होता. मात्र बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांच्या निर्देशांकांनी योग्य कामगिरी केल्याचा लाभ हा बाजाराला झाला आहे.

Advertisement

दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर बीएसईच्या 30 कंपन्यांमधील समभागांमध्ये सेन्सेक्स 190.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.26 टक्क्यांसोबत 72,831.94 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 84.80 अंकांच्या मजबूत कामगिरीसोबत निर्देशांक 22,096.75 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्समध्ये 30 समभागांपैकी 21 हे तेजीत राहिले होते. यासोबतच मारुती सुझुकी, सनफार्मा, टायटन, आयटीसी आणि इंडसइंड बँक यांचे निर्देशांक टॉप पाचमध्ये राहिले. सर्वाधिक नफा कमाईत मारुतीचे समभाग हे 3.55 टक्क्यांनी मजबूत राहिले होते.

लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा मोर्ट्स, भारती एअरटेल, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेन्ट्स, आयसीआयसीआय बँक व पॉवर ग्रिड यांचे समभाग नफा कमाईत राहिले होते.

दुसरीकडे सेन्सेक्समधील समभागात 9 समभाग हे नुकसानीत राहिले होते. इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस आणि टेक महिंद्रा यांचे सेन्सेक्स हे पहिल्या पाच कंपन्यांमध्ये घसरणीत राहिले होते. इन्फोसिसचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 2.98 टक्क्यांनी प्रभावीत राहिले होते. यामध्ये बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसी यांचे समभागही घसरणीसह बंद झाले.

शुक्रवारी बाजारातील अंतिम सत्र राहिले असले तरी, येणाऱ्या नवीन आठवडा हा चालू महिन्यातील अंतिम आठवडा राहणार असून मार्च महिन्यांचीही समाप्ती होणार आहे. यामुळे सर्व आर्थिक व्यवहारांची पडताळणी करणे तसेच नवीन आर्थिक धोरण यांची नवीन महिन्यात सुरुवात होणार आहे. यामुळे शेअर बाजारातील घडामोडीवरही विशेष लक्ष बाजारातील गुंतवणूकदार ठेवणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी या दरम्यान दिले आहेत.

Advertisement
Tags :
×

.