नव वर्षाच्या प्रारंभी सेन्सेक्स-निफ्टी मजबूत
जागतिक बाजारांमधील घसरणीनंतरही स्थानिक बाजारात उत्साहाचे वातावरण
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी व नवीन वर्ष 2025 च्या प्रारंभीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. जागतिक बाजारंमध्ये घसरणीचा कल राहिल्यानंतरही भारतीय बाजारात नव वर्ष 2025 च्या पहिल्या सत्रात तेजीसह बंद झाला आहे.मुख्य कंपन्यांच्या मदतीसोबत कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी आणि महिंद्रा अॅण्ड यांची महिन्यातील मजबूत विक्रीमुळे वाहन क्षेत्रातील समभागात चमक राहिली. याचा फायदा हा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले.
भारतीय बाजारातील बीएसई सेन्सेक्स अंतिमक्षणी 368.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 78,507.41 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 98.10 अंकांनी वधारुन निर्देशांक 23,742.90 वर बंद झाला आहे.सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये मारुती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग सर्वाधिक घसरले. एल अँड टी, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, झोमॅटो, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, स्टेट बँक आणि टायटनचे समभाग घसरून बंद झाले.
वाहन क्षेत्रात का आली चमक?
एक्स्चेंजच्या 13 प्रमुख क्षेत्रांपैकी 11 क्षेत्र वाढीसह बंद झाले. वाहन निर्देशांक 1.3 टक्क्यांवर बंद झाला. देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीचे शेअर्स 3.2 टक्क्यांनी मजबूत झाले. डिसेंबरमध्ये विक्री जवळपास 30 टक्क्यांनी वधारल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली. त्याच वेळी, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 2.4 टक्क्यांनी वाढले त्यानंतर कंपनीच्या विक्रीत 18टक्क्यांची वाढ झाली आहे.
नवीन वर्षात बाजाराची कशी राहणार स्थिती?
तज्ञांच्या मते, अमेरिकेतील उच्च उत्पन्नासह परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री करणे यासारखे घटक नवीन वर्षातही कायम राहतील. या आठवड्यात प्रसिद्ध होणारा मासिक वाहन विक्री डेटा आणि प्री-क्वार्टर ट्रेड अपडेट हे भारतीय बाजारांसाठी महत्त्वाचे ठरतील कारण ते आगामी निकाल हंगामाच्या बाजाराची दिशा ठरवणार असल्याचे म्हटले आहे.