महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चौथ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी सावरले

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिवसभर चढउतारांची स्थिती : रिलायन्स व फायनान्स कंपन्यांच्या कामगिरीमुळे बाजाराला मिळाले बळ

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात बुधवारी आलेल्या मोठ्या घसरणीला अखेर पूर्णविराम देत बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक सावरल्याचे दिसून आले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज व फायनान्शिअल कंपन्यांचे समभाग मजबूत राहिल्याचा लाभ हा बाजाराला झाल्याचे दिसून आले. चढउताराच्या प्रवासात गुंतवणूकदार अमेरिका आणि देशातील अंतर्गत आर्थिक आकडेवारीची प्रतीक्षा करत आहे. यामुळे दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 195.42 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 0.27 टक्क्यांच्या मदतीने 72,500.30 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 31.65 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 21,982.80 वर बंद झाले आहेत.

बाजारात निफ्टीमधील 32 कंपन्यांचे समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. तर 18 कंपन्यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले. मुख्य कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग हे सर्वाधिक 1.81 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एशियन पेन्ट्स, नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड कॉर्प, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, आयसीआयसीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक आणि इन्फोसिस यांच्यासह अन्य 22 कंपन्यांचे समभाग हे वधारुन बंद झाले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये टाटा मोर्ट्स 0.73 टक्क्यांनी प्रभावीत राहिले, यासोबतच टीसीएस, आयटीसी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि टेक महिंद्रा यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजसह आर्थिक कंपन्यांचे समभाग हे मजबूत राहिले. यामुळे बाजारात तेजीचा कल राहिला होता. अमेरिकन चलनवाढी संदर्भातील निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे, यामध्ये फेडरल रिझर्व्हची आगामी काळात होणारी व्याजदर वाढ निश्चित होण्याची शक्यता आहे. यामुळे याबाबत निर्णय कोणता होणार हे पहावे लागणार आहे. अभ्यासकांच्या मते ऑक्टोबर व डिसेंबर तिमाहीत आर्थिक वाढीचा दर हा घटून 6.6 टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article