महिना अखेरीस सेन्सेक्स-निफ्टी तेजीत
अमेरिकन बाजारातील नरमाईचा बाजाराला लाभ : दोन्ही निर्देशांकांमध्ये तेजीची झुळूक
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय बाजारातील चालू सप्ताहातील तिसऱ्या सत्रात गुरुवारी व नोव्हेंबर महिन्यांच्या अंतिम दिवशी शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशाकांमध्ये तेजीची झुळूक राहिली होती. यामध्ये अमेरिकन बाजारांमधील राहिलेल्या नरमाईचा कल हा भारतीय बाजाराकरीता लाभदायक ठरल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 86.53 अंकांनी वधारुन निर्देशांक 66,988.44 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 36.55 अंकांच्या तेजीसह 20,133.15 वर बंद झाला आहे.
महिना अखेरीचा कालावधी असल्याने शेड्यूल मंथली डेरिव्होटिव्ह एक्सपायरी आणि अमेरिकन बाजारांमधील नरमाई याच्या दरम्यान अस्थिर व्यापारामध्ये इक्विटी निर्देशांक वधारले आहेत. स्मॉलकॅप, मिडकॅप यांच्यातील नकारात्मक स्थितीचा भारतीय बाजाराला फायदा झाला. निफ्टी बँक, पीएएसबी निर्देशांकांत घसरण राहिली. तर औषध आणि रियल्टी क्षेत्रात मात्र तेजीचा माहोल दिसून आला.
याचदरम्या टाटा टेक आणि गंधार ऑईलसह अन्य कंपन्यांचे आयपीओ बाजारात सादर करण्यात आले असून यातील टाटा टेक व गंधार ऑईल हे गुरुवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मजबूत स्थितीमध्ये नोंदणीकृत झाले असून यामुळेही गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह राहिला असल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.
अव्वल कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे समभाग हे तीन टक्क्यांनी तेजीत राहिले असून अदानी एंटरप्राईजेसचे समभाग हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. काहीवेळ बाजारात चढउताराची स्थिती राहिली होती. मात्र अंतिम क्षणी बाजार तेजीसह बंद झाला आहे.
दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपी आकडे सादर होणार असून यामध्ये जीडीपीमधील वाढ ही 7.03 टक्क्यांवर राहणार असल्याचे संकेत आहेत. या अगोदरच्या तिमाहीत जीडीपी वाढीचे आकडा 7.8 टक्क्यांवर राहिल्यची नेंद आहे.