सेन्सेक्स-निफ्टीचा प्रवास घसरणीमध्ये
बाजारात वाहन, रियल्टीची नकारात्मक कामगिरी : जागतिक परिणामांचा प्रभाव
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय भांडवली बाजारात नवीन आठवड्याच्या गुरुवारच्या सत्रात निफ्टी सलग दुसऱ्यांदा तर सेन्सेक्स हा सलग तिसऱ्यांदा घसरणीत राहिल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने गुरुवारी बाजारात वाहन आणि रियल्टी यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण राहिली होती. तसेच जागतिक पातळीवर आशियातील बाजारांमध्ये नरमाईचा कल दिसून आल्याने भारतीय बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचा प्रवास घसरणीमध्ये बंद झाला आहे. मात्र जपानचे समभाग हे तीन सप्ताहांमध्ये सर्वात निच्चांकी पातळीवर राहिला आहे. बाजार अभ्यासकांच्या मतानुसार अमेरिकन आर्थिक स्थितीच्या काळजीमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भारतीय बाजारात काहीसे दबावाचे चित्र निर्माण झाल्याचे संकेत आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 151.48 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 82,201.16 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 53.60 अंकांनी घसरुन निर्देशांक 25,145.10 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांमधील फक्त 10 समभाग हे वधारले आहेत. तसेच निफ्टीमधील 50 मधील 17 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. क्षेत्रानुसार पाहिल्यास निफ्टीतील वाहन, ऑईल अॅण्ड गॅस व रियल्टी क्षेत्रात घसरण राहिली होती. व्यापक पातळीवर पाहिल्यास स्मॉलकॅप व मिडकॅप हे क्रमश: 1 टक्के व 0.4 टक्क्यांनी वधारुन उच्चांकी पातळीवर राहिले आहेत.
निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्हींमध्ये गुरुवारी टाटा समूहाची कंपनी टायटनचे समभाग सर्वोच्च स्थानी राहिले. यासह निफ्टीमधील अव्वल यादीत एलटी माइंड्री, विप्रो, बीपीसीएल, आयटीसी , हिरोमोटो कॉर्प, टाटा स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक, हिंडाल्को, टीसीएस यांचे समभाग वधारुन बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टीतील 33 समभाग घसरणीत राहिले. यात कोका कोला, इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, सिप्ला, डॉ. रे•ाrज लॅब आणि रिलायन्स इंडस्ट्रीज 1.46 टक्क्यांची घसरण झाली आहे. यासह बीएसई सेक्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टटा मोटर्स, नेस्ले इंडिया आणि भारती एअरटेल 1.41 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाला आहे. अमेरिकन नकारात्मक उत्पादन क्षेत्राचा डाटा आल्यामुळे आता जागतिक फायनान्स मार्केटने अमेरिकन आर्थिक आकडेवारीवर प्रतिक्रिया आली आहे. यामुळे फेडकडून करण्यात येणाऱ्या व्याजदर कपातीचा निर्णय होण्यास विलंब लांबण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टायटन 3722
- एलटीआय माइंडट्री 6149
- विप्रो 524
- बीपीसीएल 360
- आयटीसी 511
- हिरो मोटोकॉर्प 5734
- इन्फोसिस 1933
- डिव्हीस लॅब्ज 5120
- हिंडाल्को 669
- टाटा स्टील 151
- एचसीएल टेक 1790
- एसबीआय 818
- अॅक्सिस बँक 1180
- एचडीएफसी बँक 1645
- एशियन पेंटस् 3238
- अदानी एंटरप्रायझेस 3015
- अपोलो हॉस्पिटल 6934
- श्रीराम फायनान्स 3245
समभाग घसरलेल्या कंपन्या
- सिप्ला 1627
- रिलायन्स 2985
- डॉ. रे•िज लॅब्ज 6695
- कोल इंडिया 497
- ब्रिटानिया 5850
- नेस्ले 2504
- टाटा मोटर्स 1069
- बजाज ऑटो 10,855
- महिंद्रा आणि महिंद्रा 2723
- ओएनजीसी 311
- भारती एअरटेल 1547
- एचडीएफसी लाइफ 751
- जेएसडब्ल्यू स्टील 925
- इंडसइंड बँक 1422
- बजाज फायनान्स 7244
- लार्सन टुब्रो 3624
- आयशर मोटर्स 4800
- ग्रासिम 2741
- टाटा कन्झु. 1188
- पॉवरग्रिड कॉर्प 331
- एनटीपीसी 403
- अदानी पोर्टस् 1465
- बजाज फिनसर्व्ह 1864