महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स-निफ्टीचे निर्देशांक तेजीत

06:55 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खाण क्षेत्रात सकारात्मक स्थिती  : टाटा मोटर्स, एनटीपीसी, भारत पेट्रोलियम, पॉवरग्रिड कॉर्प, एशियन पेन्ट्स मजबूत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांच्या निर्देशांकांमध्ये काहीशी तेजी राहिल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्स 99.56 अंकांसह 0.12 टक्क्यांच्या तेजीसोबत बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टीही 21.20 अंकांवर तेजी प्राप्त करत बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 99.56 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 81,455.40 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 21.20 अंकांनी वधारुन निर्देशांक 24,457.30 वर बंद झाला आहे. विविध क्षेत्रांमधील कामगिरी पाहिल्यास यामध्ये मंगळवारी निफ्टी सीपीएसईमध्ये अधिकची तेजी राहिली आहे. यासह निफ्टीत औषध व एफएमसीजी यांचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत.

बीएसईमधील दिग्गज कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, एनटीपीसी, भारत पेट्रोलियम, पॉवरग्रिड कॉर्प, एशियन पेन्ट्स, टायटन, बजाज फिनसर्व्ह, कोल इंडिया, इंडसइंड बँक आणि अदानी एटरप्राईजेस यांचे समभाग हे मजबूत राहिले आहेत.

खाण क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये माधव मार्बल्स अॅण्ड ग्रॅनाइट्स, संदूर मॅगनीज अॅण्ड आर्यन, गुजरात मिनरल डेव्हलपर्स व आशापुरा मायनिंग आदीचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. फाईन ऑरगॅनिक इंडने तेजी नोंदवली होती.

अन्य कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्समध्ये लार्सन अॅण्ड टुब्रो, सिप्ला, टाटा कंझ्युमर, एसबीआय लाईफ, ग्रासिम, सनफार्मा, आयटीसी, श्रीराम फायनान्स, हिंडाल्को आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीत राहिले आहेत. वरुण बेव्हरेजचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले असून त्यांचे समभाग हे 6.41 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. यासह अल्मेबिक फार्मा, सीएसबी बँक फिडेक्स इंड यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले.

‘हे’ समभाग 52 आवड्यांच्या विक्रमी टप्प्यावर

मंगळवारी सीएएमएसचे समभाग हे 52 आठवड्यांच्या नव्या उंचीवर पोहोचले आहेत. यासह फाइन ऑर्गेनिक , जिंदाल एसएडब्लू यांनीही नवा विक्रम प्राप्त केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article