सेन्सेक्स-निफ्टीचे निर्देशांक घसरणीसह बंद
सेन्सेक्स 16 तर निफ्टी निर्देशांक 5 अंकांनी नुकसानीत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत झाले आहेत. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 16 अंकांनी नुकसानीत राहिला तर 5 अंकांनी नुकसानीत राहिला आहे. निफ्टीमधील 50 समभागांपैकी 29 समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
यासह दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 16.29 अंकांनी वधारुन निर्देशांक 64,942.40 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 5.05 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 19,406.70 वर बंद झाला आहे.
भारतीय बाजारात मंगळवारच्या सत्रात अंतिम 10 मिनिटात सेन्सेक्समध्ये काहीशी रिकव्हरी झाली. घसरणीमधून सावरण्याचा बाजाराने प्रयत्न केला आहे. मात्र अंतिम क्षणी बाजारात घसरणीची नोंद झाली आहे. निफ्टीमधील मिडकॅप 100, बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक यांचे निर्देशांक हलक्या तेजीसह राहिले होते. तेजीमधील मुख्य कंपन्यांमध्ये हिरोमोटो कॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया आणि बजाज फायनान्स यांच्या समभागांचा समावेश राहिला आहे.
गौतम अदानी समूहामधील 9 लिस्टेड कंपन्यांमध्ये सात कंपन्यांचे समभाग प्रभावीत राहिले. तर अदानी ग्रीन एनर्जी आणि एनडीटीव्हीचे समभाग काहीसे तेजीत राहिले. अदानी पॉवरचे समभाग हे 2.56 टक्क्यांसह सर्वाधिक नुकसानीत राहिले.
शेअर बाजारामध्ये पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड, कामधेनू, ओम इंफ्रा, युनिपार्टस इंडिया, एक्साइड इंडस्ट्रीज, गती आणि जिओ फायनाशिअल सर्व्हिसेस यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर टाटा मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद1ा, स्टोव क्राफ्ट आणि देवयानी इंटरनॅशनलचे समभाग नकारात्मक स्थितीत राहिले आहेत.
चीनच्या आर्थिक आकडेवारीचा प्रभाव
चीनमधील मिळत्याजुळत्या आर्थिक आकडेवारीमुळे आशियाई बाजारात घसरण राहिली आहे. याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारात दिसून आला.