सेन्सेक्स-निफ्टीचे निर्देशांक घसरणीसह बंद
निफ्टी मात्र 10 अंकांसह प्रभावीत : दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सप्ताहातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई सेन्सेक्स यांचे निर्देशांक काहीशा प्रमाणात घसरणीत राहिले आहेत. यामध्ये सेन्सेक्स 5 तर निफ्टीचा निर्देशांक 10 अंकांनी नुकसानीत राहिल्याचे दिसून आले. चौथ्या सत्रात बाजारात चढउताराची स्थिती राहिली होती. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी भारतीय बाजारात चढउताराची परिस्थिती राहिली होती. मात्र बाजारातील अंतिम क्षणी घसरण नेंदवली आहे. ज्यामध्ये बीएसई सेन्सेक्स 5.43 अंकांनी घसरुन निर्देशांक 66,017.81 वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी दिवसअखेर 9.85 अंकांच्या नुकसानीसोबत 19,802.00 वर बंद झाला आहे.
गुरुवारच्या सत्रात अडथळ्यांच्या प्रवासात बाजारामध्ये काहीसा दबाव राहिला होता. या दरम्यान इक्विटी बेंचमार्क निर्देशांक आणि निफ्टी यांची कामगिरी मात्र नकारात्मक राहिली होती. याचा परिणाम म्हणून सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक कंपनीचे समभाग हे 1.75 टक्क्यांनी सर्वाधिक नुकसानीत राहिले. यासह लार्सन अॅण्ड टुब्रो, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी, एनटीपीसी, इन्फोसिस, टायटन आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग मात्र प्रभावीत होत बंद झाले. दुसरीकडे इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, विप्रो, एचडीएफसी बँक आणि टाटा स्टील यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा प्रभाव कायम राहिला होता. यामध्ये विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांनी बुधवारी 306.56 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केल्याची माहिती शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीमधून समोर आली आहे.
रुपया प्रभावीत
बाजारात स्थानिक कॉर्पोरेट आणि मोठ्या विदेशी बँकांच्याकडून डॉलरची मागणीच्या कारणामुळे भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गुरुवारी 0.03 टक्क्यांनी प्रभावीत होत 83.35 वर राहिला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक 1487
- जेएसडब्ल्यू स्टील 776
- भारती एअरटेल 978
- एचडीएफसी बँक 1521
- विप्रो 402
- टाटा स्टील 126
- नेस्ले 24428
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2395
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1545
- स्टेट बँक 559
- आयटीसी 440
- आयसीआयसीआय 923
- बजाज फिनसर्व्ह 1623
- अॅक्सिस बँक 999
- एचसीएल टेक 1330
- पीआय इंडस्ट्रीज 3748
- बीपीसीएल 411
- आयशर मोर्ट्स 3870
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अल्ट्राटेक सिमेंट 8607
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3047
- बजाज फायनान्स 7075
- टीसीएस 3508
- एनटीपीसी 252
- इन्फोसिस 1449
- टायटन 3412
- सनफार्मा 1200
- कोटक महिंद्रा 1738
- एशियन पेन्ट्स 3121
- पॉवरग्रिड कॉर्प 210
- टेक महिंद्रा 1212
- टाटा मोर्ट्स 679
- मारुती सुझुकी 10485
- हिंदुस्थान युनि 2521
- सिप्ला 1168
- झोमॅटो 112
- ल्युपिन 1196
- वेदान्ता 234
- मॅरिको 529
- टाटा पॉवर 260
- सीजी कझ्युमर 288
- हॅवेल्स इंडिया 1302