सेन्सेक्स-निफ्टीचे निर्देशांक पुन्हा भक्कम
कोल इंडियाचे समभाग 4 टक्क्यांनी तेजीत, अदानीमध्ये मात्र घसरण
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजाराने पुन्हा आपली स्थिती आणखीन भक्कम केली आहे. जागतिक बाजारांमधील राहिलेल्या सकारात्मक वातारणाचा फायदा हा बाजारात होत असून यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक रोज नवी उंची प्राप्त करत असल्याचे दिसून येत आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 371.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 72,410.38 वर बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 123.95 अंकांच्या मजबूतीसोबत निर्देशांक 21,778.70 वर बंद झाला आहे. विविध कंपन्यांच्या कामगिरीत कोल इंडियाचे समभाग हे 4 टक्क्यांनी सर्वाधिक मजबूत राहिले.
यासोबतच एनटीपीसी 3 टक्के, महिंद्राचे समभाग 2.59 टक्क्यांनी वधारले, भारत पेट्रोलियम 2.54 टक्के वधारुन 466 रुपयांवर बंद झाले आहेत. अभ्यासकांच्या मते गुंतवणूकदारांनी नफा कमाई केल्याने बाजारात घसरणीची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे भाकीत मांडले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्ये 38 समभाग हे तेजीत राहिले. एक समभगांचे भावात कोणताही बदल झालेला नसून 11 समभाग मात्र घसरणीत राहिले. बीएसई सेन्सेक्समध्ये तेजी पहावयास मिळाली असून यात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल यांचे समभाग मजबूतीसह बंद झाले. मुख्य क्षेत्रांमध्ये निफ्टी बँक, बीएसई स्मॉलकॅप आणि निफ्टी मिडकॅप यांचे निर्देशांक वधारले आहेत.
विश्लेषकांच्या मते...
गुंतवणूकदारांनी सलगची उचलेली जोखीम आणि भारतामधील आर्थिक वृद्धीचे संकेत यामुळे भारतीय बाजारात दररोज एक नवा विक्रम नोंदवला जात आहे. यासह अमेरिकेमधील व्याजदर कपातीच्या संकेतामुळे विदेशी भांडवलाचा प्रवाह सुरु आहे. आणि अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये घसरण राहिल्याचा परिणामही भारतीय बाजारातील कामगिरीवर होत असल्याचे मत विश्लेषकांनी यावेळी व्यक्त केले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- कोल इंडिया 380
- महिंद्रा आणि महिंद्रा 1734
- हिरोमोटो कॉर्प 4173
- एनटीपीसी 313
- डॉ. रे•िज लॅब्ज 5858
- बीपीसीएल 465
- पॉवरग्रिड कॉर्प 239
- नेस्ले 26,249
- टाटा मोटर्स 753
- सिप्ला 1260
- आयटीसी 464
- भारती एअरटेल 1036
- हिंडाल्को 614
- डिव्हीस लॅब्ज 3939
- ओएनजीसी 208
- अपोलो हॉस्पिटल 5760
- ब्रिटानिया 5282
- कोटक महिंद्रा 1921
- एसबीआय लाइफ 1435
- इंडसइंड बँक 1610
- सन फार्मा 1262
- रिलायन्स 2605
- ग्रासिम 2139
- बजाज फिनसर्व्ह 1681
- टायटन 3715
- टाटा स्टील 138
- एचडीएफसी लाइफ 648
- एसबीआय 651
- बजाज फायनान्स 7258
- आयसीआयसीआय 1005
- अॅक्सिस बँक 1107
- एचडीएफसी बँक 1705
- एचसीएल टेक 1472
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अदानी एंटरप्रायझेस 2809
- लार्सन टुब्रो 3518
- अदानी पोर्टस 1016
- आयशर मोटर्स 4091
- एलटीआय माइंट्री 6253
- विप्रो 469
- टीसीएस 3799
- इन्फोसिस 1562